आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video मैत्रिणीने उंच पुलावर मागून दिला धक्का.. कॅमेऱ्यात सर्व कैद झाले, नंतर म्हणाली Sorry

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन-अमेरिकेच्या योकॉल्टमध्ये एका मुलीला तिच्या मैत्रिणीने 60 फूट उंचीच्या पुलावरून नदीत ढकलले. या मुलीचा जीव वाचला पण ती गंभीर जखमी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार 16 वर्षांची जॉर्डन ही उंचीला घाबरत होती. त्यामुळे तिने उडी मारायला नकारही दिला होता. पण तरीही तिच्या मैत्रिणीने तिला धक्का दिला. Ashley Mahree हिने हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला. 

 

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार जॉर्डन मित्रांबरोबर लुईस नदीवरील मॉलटन फॉल्सवर फिरायला गेली होती. याठिकाणी सर्वांनी स्विमिंग करायेच ठरवले. सगळे मित्र जवळच्या पुलावरून उडी मारत होते. जॉर्डनलाही सगळे उडी मार म्हणत होते, पण ती खूप घाबरलेली होती. ती उडी मारायला वारंवार नकार देत होती, तेवढ्यात तिच्या एका मैत्रिणीने तिला ढकलले. 

 
जॉर्डनच्या आईने स्थानिक मीडियाला सांगितले की, त्यांना माझ्या मुलीला मारायचे होते, असे वाटतेय. ती जीवंत आहे पण उपचाराला खूप वेळ लागणार आहे. जॉर्डनच्या आईने सांगितले की, ढकलणारी मैत्रीण माझ्याशी फोनवर बोलली, तीने माफीही मागितली. असे काही होईल अशी कल्पनाच नव्हती असे ती म्हणाली. 
 

जॉर्डन म्हणाली, मी मेले असते 
हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारी जॉर्डन म्हणाली की, तिने माफी मागितली आहे पण ते पुरेसे नाही. त्याचे कारण म्हणजे माझा जीवही गेला असता. पोलिसांनी सांगितले की, ज्या पुलावरून जॉर्डनला ढकलले गेले त्यावरून उड्या मारणे अवैध आहे. 

बातम्या आणखी आहेत...