आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून पळून गेलेल्या मुलीला किन्नरने आई बनून लोकांच्या वाईट नजरेपासून वाचवले, म्हणाली- ट्रेनमध्ये मिळाली होती, चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडून नये म्हणून घरी घेऊन गेले...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवभोग(रायपुर)- अल्पवयीन बेपत्ता झाली म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनीही तपास सुरू केला. घरच्यांनाही काही वाईट होईल याचा संशय होता पण मुलगी 11 दिवस बिलासपूरच्या किन्नरांमध्ये एकदम सुरक्षित होती. तिला सुरक्षित ठेवणारी किन्नर रेहाना आणि तिचे साथी तिला शुक्रवारी सुरक्षित परत घेऊन आले, आणि डोळ्यांतील आश्रुसोबत तिला पोलिसांच्या स्वाधीन केले. खरतर, चुकीच्या व्यक्तीच्या हातात ती पडू नये त्यामुळे तिला किन्नरांनी आपल्या घरी नेले. आधी तिला मुलीप्रमाणे सांभाळ केला आणि नंतर समदावून घरी सोडून आली. मुलीला पोलिसांच्या स्वाधीन करताना रेहाना आणि तिचे साथी खुप रडले. पोलिसांनी त्या किन्नरला सन्मानित करण्याचे ठरवले आङे.

 

पोलिस अधिक्षक सत्येन्द्र श्याम यांनी सांगितले की, 2 जानेवारीला एक लिखीत तक्रार मिळाली की, 9 वीत शिकणाऱ्या मुलीच्या किडनॅपींगचा संशय व्यक्त केला जात आहे. 29 डिसेंबरला ट्यूशनसाठी निघालेली मुलगी घरी परतलीच नाही. मुलीच्या किडनॅपींगचा संशय घेत पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि शोध सुरू केला. घरातून मोबाईलदेखील गायब होता, ट्रेस केल्यावर 31 डिसेंबरपर्यंत चालु असल्याचे कळाले. त्यावर शेवटची लोकेशन बिलासपूर रेल्वे स्टेशन दाखवली. बंद मोबाईलमुळे घरच्यांना वेगळीच चिंता सतावत होती, आणि पोलासंनाही तिला सुरक्षित घरी आणण्याचे मोठे आव्हान होते. तीन दिवसांपूर्वी घरच्यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला, त्याचे लोकेशनही बिलासपूर रेल्वे स्टेशन होते. त्या आधारावर 9 जानेवारीला उपनिरीक्षक विवेक सेंगरसोबत महिला पोलिसांची टीम पाठवण्यात आली. त्यानंतर पोलिस बिलासपुरच्या सिरगिट्टी परिसरात राहणारी किन्नर रेहाना उर्फ बॉबी जानच्या घरातून शुक्रवारी मुलीला सुरक्षित घरी आणले.


घर बांधण्यासाठीचे पैसे खर्च केले म्हणून पळाली
शुक्रवारी मुलीला परत आणल्यानंतर तिला बाल संरक्षण अधिकाऱ्यासमोर सादर केले. मुलीने त्यांना सांगितले, कोणीच तिला किडनॅप केले नव्हते, घर बांधण्यासाठी साठवलेल्या 20 हजार रूपयांमधून 13 हजार रूपये मी खर्च केले होते. त्यानंतर घरचे रागवतील या भितीने मी आधी रायपूरच्या बस स्टँडवर गेले आणि तेथून ऑटोने रेल्वे स्टेशनला गेले. कुठे जायचे ते कळत नव्हते त्यामुळे समोरून येत असलेल्या ट्रेनमध्ये बसले. बिलासपूरला पोहचण्याच्या अर्ध्या तासापूर्वी किन्नर रेहानाचे तिच्याकडे लक्ष गेले. मुलीने सगळा प्रकार सांगितल्यावर रेहानाने तिला आपल्या घरी नेले. मुलीने सांगितले की, रेहानाने तिला आपल्या मुलीप्रणाणे सांभाळले, तिला नवीन कपडे दिले, चांगले खायला दिले. एका आठवड्यानंतर रेहानानेच कुटुबीयांना संपर्क करून मुलगी सुरक्षित असल्याचे सांगितले.


समस्येत असलेल्या मुलींची आई तर बनू शकते ना.
आम्ही मुलीच्या सुरक्षिततेची प्रार्थना करतो साहेब. आम्ही आई-वडील तर नाही बनू शकत पण त्रासात असलेल्या मुलींची आई तर बनूच शकतो ना. मुलीला कुठे जायचे माहीत नव्हते, आणि नंतर चुकीच्या हातात जाईल या भितीने मी तिला आपल्या घरी नेले. मुलीला कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्यानंतर माझ्या घरात शुकशुकाट पसरला आहे, आता मी कसं राहू.- रेहाना उर्फ बॉबी

 

बातम्या आणखी आहेत...