उल्हासनगरमध्ये पंधरा वर्षांच्या / उल्हासनगरमध्ये पंधरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार

May 28,2011 03:56:39 PM IST

उल्हासनगर - १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर-३ येथील शांतीनगर परिसरात राहणारी १५ वर्षीय मुलगी इंदजीत रॉय यांच्याकडे कामाला होती. ११ मे रोजी मुलगी तिच्या शेजारच्यांसह गजानन मार्केट येथे खरेदीला गेली होती. त्या वेळी पोलीस असल्याचे सांगत विजय शाहू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौकशीच्या बहाण्याने मुलीला उल्हासनगर-४ येथील मौर्यानगर परिसरातील एका खोलीत डांबून ठेवले. यानंतर विजय शाहूने इंदजीत रॉयकडे ३० हजार रुपये देण्याची मागणी केली. दहा दिवसानंतर रॉय यांनी ३० हजार रुपये दिल्यानंतर सर्वांची सुटका केली. यानंतर पीडित मुलीने विजय शाहू याने आपल्यावर तीनवेळा बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली.X