आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाचा वर्गातच तरुणीवर अत्याचार, नवी मुंबईतील खासगी क्लासेमधील धक्कादायक घटना उघड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी मुंबई | खारघर येथे गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. महेश ट्युटोरिअल या खासगी शिकवणीतील एका शिक्षकाने वर्गातच तरुणीवर बलात्कार केला. तर याच शिकवणीतील आणखी एका शिक्षकाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दीपेश जैन आणि अनुप शुक्ला असे आरोपी शिक्षकांची नावे आहे. आरोपींवर 376, 342, 232 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याता आला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार त्यांचा शोध सुरु आहे.

तक्रारदार तरुणी या खासगी क्लासेसमध्ये पार्ट टाईम काम करत होती. मागील आठवड्यात संध्याकाळी साडेवाजता ती क्लासमधून निघाली होती. मात्र छत्री विसरल्यामुळि परत क्लासमध्ये आली. त्यावेळी शिक्षक दिनेश जैन याने दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला. परंतु भीतीपोटी तरुणीने सदरील प्रकार कुटुंबीयांना सांगितला नाही. परंतु चार दिवसांनी दुसरा शिक्षक अनुप शुक्लानेही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तरुणीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितले. अखेर खारघर पोलिस ठाण्यात दोन्ही शिक्षकांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.