आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धानाेरा येथे बालकांना विहिरीत फेकणारा आराेपी रडला ढसाढसा; कृत्याचा पश्चाताप; न्यायालयाने पाच दिवसाची दिली पाेलिस काेठडी  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अडावद- चाेपडा तालुक्यातील धानोरा येथील मुस्लीम वस्तीत राहणाऱ्या दोन बालकांना विहिरीत फेकून देणारा संशयित शेख खालिद शेख ईस्माईल यास पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. दरम्यान, त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप करून ढसाढसा रडत आहे. त्याला त्यांच्या आईची आठवण येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

 

याप्रकरणी खालिदच्या अडावद पोलिस ठाण्यात अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक करून शनिवारी तपास अधिकारी डीवायएसपी सौरभ अग्रवाल यांनी अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायाधिश आर.पी.पांडे यांनी आरोपीला १६पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारी वकील किशोर आर. बागुल यांनी कामकाज पाहिले.

 

कृत्याचा पश्चाताप 
आरोपी शेख खालिद शेख ईस्माईल हा गुरूवार रात्रीपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या चौकशीत वारंवार होणाऱ्या प्रश्नांमुळे त्याच्या हातून किती मोठी चुक झाली हे लक्षात आल्याने तो ढसाढसा रडत आहे. . आपण पोलिसांना सर्व खरे सांगुन टाकले आहे म्हणून पोलिस आपल्याला सकाळी सोडून देतील या आशेवर असलेल्या खालिदने गुरूवारी रात्री निवांत झोप घेतली व जेवणही पोटभर केले. मात्र शुक्रवारी पोलिसांना बालकांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी खालिदला पोलिस कोठडीत टाकले. त्यावेळी आपल्या हातून माेठी चूक झाल्याचे खालिदच्या लक्षात आले. कृत्याचा पश्चात्ताप करत ढसाढसा रडत आहे. दरम्यान, त्याचे आईवडील गाव साेडून बाहेरगावी निघून गेले. त्याचे वडील केळीचे घड वाहतात. तर आई जिल्हा परिषदेच्या ऊर्दू शाळेत मदतनीस म्हणून आहे. शालेय समितीने त्यांच्या आईचे काम थांबवले आहे. 

 

आईचे येतेय आठवण 
गावात नेहमी आईसोबत फिरणाऱ्या, जेवण करणाऱ्या व प्रामाणिकपणे सर्व सांगत असलेल्या खालिद शेख यास ५० तास उलटूनही आईशी भेटायला मिळाले नाही. तो पोलिसांना पुन्हा पुन्हा सांगतोय 'मुझे माँ की बहूत याद आ रही है...' अशी माहिती गोपनीय सुत्रांकडून मिळाली. 

 

पोलिसांना दिल्या सूचना 
अडावद पोलिसांनी किंवा अधिकाऱ्यांनी माहिती कुणाला देऊ नये. कुणाला काय माहीती व काय प्रतिक्रिया द्यायची ती मी देईल अशी सक्त ताकीद पाेलिस उपविभागीय अधिकारी साैरभ अग्रवाल यांनी दिल्याने या प्रकरणाबाबत अडावद पोलिस ठाण्यातील एकही पोलिस कर्मचारी बोलण्यास अथवा माहिती देण्यास तयार नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...