आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात फेरे झाल्यानंतर सिंदूर भरण्यास नवरीने दिला नकार, सांगितले विचित्र कारण; तीन तास चालला गोंधळ, नंतर पोलिसांच्या उपस्थितीत पार पडले लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रांची : सध्या लग्नसराई सुरू आहे. अशातच विचित्र कारणांनी लग्न मोडले असल्याच्या बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. रांची येथेही अशाच एका विचित्र कारणामुळे लग्न मोडता मोडता राहिले. चक्क पोलिसांच्या बंदोबस्तात हा लग्नसोहळा पार पडला. सात फेरे घेतल्यानंतर ऐन वेळेवर सिंदूरदान विधी पूर्ण करण्यास नकार दिला. 

 

- आदित्यपूर येथील रहिवासी अमित यांचा विवाह गालूडीह गावात निश्चित झाला होता. 

- अमित 60-70 लोकांचे वऱ्हाड घेऊन लग्नासाठी पोहोचला. 

- रात्री 2 वाजता नवरा-नवरी लग्नमंडपात आले. सिंदूरदान करतेवेळी नवरीची नजर नवरदेवाच्या बोटावर पडली आणि तिने सिंदूरदान करण्यास विरोध केला. कारण नवरदेवाला बोटच नव्हते. मुलीने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली. 


तीन तास चालला वाद-विवाद

- मुलाला एखादा आजार असल्याची वधूपक्षाकडील मंडळींना शंका येत होती. याबाबत दोन्हीकडील पक्षांमध्ये तीन तास वाद-विवाद झाला. 

- शेवटी वरपक्षाकडील लोक लग्न न करताच माघारी फिरले तेव्हा हे प्रकरण आणखीनच गंभीर झाले. 

- काही गावकऱ्यांनी नवरदेवाच्या गाडीसमोप मोटारसायकल आडव्या केल्या.

- माझी बोट आजारामुळे नाही, तर एका अपघातात मशीनमुळे कापल्या गेली असल्याचे नवदेव अमितने सांगितले. 
- यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला. 

बातम्या आणखी आहेत...