आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोहम : काही वर्षांपूर्वी इंग्लंड येथे राहणाऱ्या एका मुलीला तिच्या स्कूल टीचरने शाळेची असाइनमेंट करण्यास सांगितले होते. असाइनमेंटसाठी भागातील क्रूरपणे अपराध करणाऱ्या सीरियल किलर्सचा विषय देण्यात आला होता. सोबतच शिक्षिकेने गुन्हेगारांच्या यादीतील एकाचे नाव निवडण्यासाठी सांगितले. मुलीने त्यातील एका नावाची निवड केली. त्यानंतर तिने घरी आल्यावर गुगलवर ते नाव शोधले असता तिला धक्काच बसला. कारण तो फोटो तिच्या वडिलांचा होता. त्याने दोन मुलांचा खून केला होता. मुलीने आणि तिच्या आईने एका टीव्ही शो मध्ये मुलाखत देताना याबाबत सांगितले होते.
गुगलवर फोटो पाहताच मुलीच्या मनात भरली धडकी
- ही गोष्ट इंग्लंडच्या सोहम येथे राहणाऱ्या सामंथा ब्रायन (18) हिची आहे. दोन वर्षांपूर्वी सामंथाच्या शाळेतील शिक्षिकेने परिसरातील अपराध करणाऱ्या सीरियल किलर्सवर एक असाइनमेंट तयार करण्यास सांगितले होते.
- तसेस शिक्षिकेने तिला क्रिमिनल्सच्या नावाची सूची देखील दिली होती. सामंथाने या सूचीतील इयान हंटले या गुन्हेगाराची निवड केली होती. हंटलेने 2002 मध्ये क्लिथोर्प्स शहरात होली वेल्स (10) आणि जेसिका चेपमॅन (14) या दोन मुलांचा खून केला होता. या अपराधासाठी तो आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता.
- सामंथाने घरी आल्यानंतर इयान हंटले विषयी गुगलवर सर्च केले असता समोर आलेला फोटो पाहून तिला धक्काच बसला. कारण त्या फोटोमध्ये सामंथाने त्या गुन्हेगारासोबत तिची आई आणि स्वतःला पाहिले होतो. सामंथा 10 वर्षाची असातानाचा हा फोटो होता.
- सामंथाच्या मते, तो फोटो पाहिल्यानंतर ती शॉक्ड झाली होती, तिने ही गोष्ट आईला सांगितल्यानंतर आईने देखील तेच उत्तर दिले जे सामंथाला वाटले होते.
सामंथाच्या आईला धोका देऊन पळून गेला होता तिचा पिता
- सामंथाने सांगितले की, ही गोष्ट माहीत झाल्यानंतर मला खूप दुःख झाले होते. माझ्या डोक्यात हजारो प्रश्न फिरत होते. मी एखाद्या गुन्हेगारासोबत स्वतःला जोडू इच्छित नव्हते.
- एका टीव्ही शो दरम्यान सामंथाच्या आई कॅटी ब्रायनने सांगितले की, इयान दोन मुलांची हत्या केली होती तेव्हा सामंथा चार वर्षांची होती. ती आपल्या जन्मदात्या वडिलांना फक्त दोन-तीन वेळेस भेटली होती. यावेळी त्यांनी आपली लव्हस्टोरी देखील शेअर केली. कॅटी पुढे म्हणाली की, मी 15 वर्षांची असाताना इयानची आणि माझी भेट झाली होती. तो मला गरोदर करून पळून गेला होता. यानंतर कॅटीने मॉर्टिन ब्रायनसोबत लग्न केले होते. सामंथा मॉर्टिनलाच आपला पिता मानत होती.
- सामंथाने आपल्या जन्मदात्या पित्याविषयी बोलताना सांगितले की, मी त्याचे नाव न घेण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मनात त्याच्याविषयी चीड निर्माण झालेली आहे. ते वडील नाहीत, त्याची स्पर्म डोनरशिवाय कोणतीच भूमिका नाहीये. अनुवांशिकरित्या तो माझ्या जोडलेला या गोष्टीचे मला खूप दुःख आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.