आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डेट्रॉइट : अमेरिकेतील डेट्रॉइट येथे एका कुत्र्याचा राक्षसीपणा आणि 6 वर्षीय मुलीच्या चातुर्याचे दर्शन घडवणारे प्रकरण समोर आले आहे. पीटबूल जमातीच्या या पाळीव कुत्र्याने चिमुकलीसमोर तिच्या वडिलांचा चेहरा खाल्ला तर तिची आई दुसरा शिकारच्या रूपात बाजूला बेशुद्ध पडलेली होती. हे भयानक दृश्य घडत असताना मुलीने असे काही केले की, ज्यामुळे तिचे आणि तिच्या आईचे प्राण वाचले.
पोलिसांच्या मते, येथील माउंट मॉरिस रेसिडेन्सीमध्ये ही हृदय पिटाळून टाकणारी घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या परिवाराच्या पाळीव कुत्र्याने एका व्यक्तीचा चेहरा खाल्ला आहे. 6 वर्षाची मुलगी एका ठिकाणी लपून हा सर्व प्रकार बघत होती. तिने भीतीने थरथरत चतुराईने या घटनेचा फोटो काढून फेसबुकवर अपलोड केला. फोटो पाहताच नातोवाईकांना या भयंकर घटनेविषयी माहीत झाले आणि त्यांनी तत्काळ आपत्कालीन सेवेशी संपर्क साधला.
यामुळे पिटबुलने व्यक्तीला खाण्यास सुरूवात केली
- पोलिसांच्या मते, पती-पत्नी दोघेही झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून झोपले होते. पत्नीला ओव्हरडोस झाल्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. दरम्यान पिटबुलने अचानकपणे मुलीच्या वडिलांना मृत झालेले समजून त्यांचा चेहरा खाण्यास सुरुवात केली. मुलीने जर वेळेवर फोटो केला नसता तर पिटबुलने तिच्या आईसोबत तिलाही फस्त केले असते.
- मुलीने पोलिसांना सांगितले की, तिला लवकर जाग आली होती. पण तिचे आई-वडील उठले म्हणून तिने त्यांच्यावर पाणी टाकले. तेवढ्यात अचानक त्यांचा कुत्रा तेथे आला आणि त्याने तिच्या वडिलांचा चेहरा खाण्यास सुरुवात केली. दोघांची मेडिकल रिपोर्ट्स आणि मुलीच्या आईला शद्ध येण्याची वाट पाहण्यात येत आहे. दोघेही अचानकपणे कसे बेशुद्ध झाले का त्यांना बेशुद्ध करण्यात आले याबाबत तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.