आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'असे वडील कोणालाच भेटू नयेत, किंवा अशा लोकांच्या घरात मुलीचा जन्मच होऊ नये...\', वडिलांबद्दल सांगताना मुलीला अश्रु अनावर , आई म्हणाली-काही जरी झाले तरी मुलीला डॉक्टर बनवणार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडवा(मध्यप्रदेश)- शहराजवळील जसवाडी गावात शुक्रवारी संध्याकाळी वर्षांच्या मुलीला यामुळे मारले कारण, तिला वडिलांच्या इच्छेने लग्न करायचे नव्हते. मुलीला शिकून डॉक्टर बनायचे आहे. आईने शेतात राबून कसे-बसे तिला शाळेत शिकवले, आता ती कॉलेजला गेली आहे, बीएससी करत आहे पण वडिलांना ते आवडत नाही. वडिलांचे म्हणने आहे की, मुलगी 19 वर्षांची झाली आहे, आता तिचे लग्न केले पाहिजे. या गोष्टीवरून झालेल्या वादात वडिलांनी मुलीला मारहाण करत तिच्या हातावर कोयता मारला, त्यात ती जखमी झाली. वडिलांच्या मारहाणीला कंटाळून शुक्रवारी ती आईसोबत पोलिस ठाण्यात गेली, आणि वडिलांविरूद्ध मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली.


मुलगी म्हणाली असे वडील कोणत्याच मुलीला मिळू नयेत
पोलिसांसमोर वडिलांडे कृत्य सांगताना मुलीला अश्रु अनावर झाले. ती म्हणाली, ''लहानपणापासून वडिलांना आईला मारताना पाहिले, या वेळस तर हद्द झाली. त्यांनी माझ्यावर कोयत्याने वार केला. शेतात मजुरी करून आईने 12वी पर्यंत कसे शिकवले, हे मी शब्दात नाही सांगु शकत. वडिलांना माझे लग्न करायचे आहे, पण मला आता लग्न करायचे नाहीये. मी बीएससी प्रथम वर्षात आहे, आणि मला पुढे शिकुण डॉक्टर बनायचे आहे. हे माझे स्वप्न आहे, माझी जिद्द आहे आणि त्यापुढे मी माझ्या वडिलांचे ऐकणार नाहीये, मग त्यांनी माझा जीव घेतला तरी चालेल. वडिलांमुळेच माझ्या 15 आणि 17 वर्षांच्या भावांचे भविष्य खराब झाले. दोघे जनावर सांभाळतात, पण दोघांनाही शिकायचे होते, वडिलांनी त्यांना शाळेत जाऊ दिले नाही.''


आई म्हणाली दिवस-रात्र मजुरी करून मुलीला शिकवेल
पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आई आणि मुलगी जास्तीच घाबरल्या. आईला भिती आहे की, वडील आता तिला जीवे मारतील. मुलीची आई म्हणाली, ''मी तर लग्न झाल्यापासून नवऱ्याचा मार खात आहे, दुसरी कोणी असती तर कधीच पळून गेली असती. मुलगी तारूण्यात आली आहे, तरी माझ्या नवऱ्याला काही कळत नाही. तो मजुरी करणाऱ्या मुलाच्या हातात मुलीचे लग्न करायचे म्हणत आहे. माझ्या मुलीला शिकुण डॉक्टर बनायचे आहे आणि मी दिवस-रात्र मजुरी करून तिला शिकवेल.''

 

बातम्या आणखी आहेत...