आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या ऑपरेशनसाठी तिच्याकडे नव्हते पैसे..स्वामीनारायण मंदिरातील साधूने दाखवले पैशाचे आमिष, 2 वेळा केला बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- स्वामीनारायण मंदिरातील एका साधूने मुलीला पैशाच आमिष दाखवून तिच्यावर दोन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडीत मुलीची आई हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असून तिच्याकडे अॉपरेशनसाठी पैसे नव्हते. त्यामुळे नराधमाने पीडितेला आईच्या ऑपरेशनसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर दोनदा बलात्कार केला.

 

पीडितेने पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली असून त्यात एका महिलेचेही नाव घेतले आहे. संबंधित महिला फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. पीडित मुलगी सुरतमधील जहांगिरपूरा भागात राहते. तिचे वडील आजारी असल्यामुळे तिच्या आईला मोलमजुरी करावी लागते. तिची आई साडीला स्टोन लावण्याचे काम करते. मशीनवर काम करताना तिच्या आईच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. डॅाक्टरांनी तिला ऑपरेशन करण्यास सांगितले आहे. ऑपरेशनसाठी तिच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे कामाच्या शोधात ती कतारगाव येथे गेली होती. या ठिकाणी एक महिलेसोबत तिची ओळख झाली. मुलीने आपली करुण कहाणी महिलाला सांगितली.

 

पैसे देतो, असे सांगून केला 2 वेळा बलात्कार...

पीडीत मुलीला महिलेने पैसे घेण्यासाठी तिला डाभोळीजवळच्या स्वामीनारायण मंदिरात बोलवले. परंतु महिलेने मुलीला मंदिरातील साधूच्या ताब्यात दिले. साधूने तिच्यावर बलात्कार केला. तसेच मुलीला पैसेही दिले नाही.  नंतर पैसे देतो असे सांगून तिला घरी पाठवून दिले.

 

पीडित मुलगी तिच्या आईसोबत 23 ऑक्टोबरला पुन्हा स्वामीनारायण मंदिरात गेली होती. त्यावेळीही साधुने तिला पैसे देतो असे सांगून तिच्यावर दुसर्‍यांदा बलात्कार केला. यावेळीही साधूने मुलीला पैसे दिले नाही. मंदिरातून बाहेर आल्यानंतर मुलीने आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. पीडितेच्या भावाने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला.

 

वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच कारवाई- पोलिस आयुक्त
पोलिस आयुक्त सतीश शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणी तपास सुरु आहे. पीडित मुलीचा वैद्यकीय अहवाल अाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. आरोपी महिलेचाही पोलिस शोध घेत असल्याचे शर्मा यांनी सां‍गितले.

बातम्या आणखी आहेत...