आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाखात युवतीची विक्री करणाऱ्या दलाल महिलांसह नऊ अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातून अपहरण करून राजस्थानात युवतीची विक्री केल्या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये दोन महिला दलालांचाही समावेश आहे. शहरातील या युवतीची राजस्थानात दीड लाख रुपयात विक्री झाल्याचे अटकेतील आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान शुक्रवारी (दि. १६) रात्री अटक केलेल्या दोन्ही महिलांना न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

 

प्रवीणकुमार न्यानलालजी सोनी (२६), शांती लाल न्यानमलजी सोनी (२७, दोघेही रा. सिरोई, राजस्थान), कुलदीप बबनराव तांबे (२६, रा. फ्रेजरपुरा), कैलाशचंद्र सुखदेवजी अग्रवाल (५९, सिरोई), शैलेंद्र रामचंद्र राऊत (३६, रा. यशोदा नगर), जगदिश नारायण लाल मोंग्या (२३, रा. सिरोई), निकेशकुमार नारायणलालजी रावल (२८, रा. सिरोई), रेखा देवचंद्र इंगळे (४२, रा. कैलाश टेकडी, अकोला) आणि माया ऊर्फ मयूरी दत्ताजी कांबळे (२३, रा. कृषी नगर, अकोला) यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

 

शहरात राहणाऱ्या एका महिलेने मुलीचे अपहरण करून राजस्थानात तिची विक्री केल्याची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांत दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांंनी ८ नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला आणि नऊ नोव्हेंबरला पथक राजस्थानसाठी रवाना झाले. दरम्यान १० नोव्हेंबरला सदर युवतीची पोलिसांनी राजस्थानातील सिरोई गावात राहणाऱ्या प्रवीणकुमार सोनीच्या घरातून सुटका केली होती. त्यानंतर पोलिस पथक युवतीला घेवून १२ नोव्हेंबरला शहरात परत आले. दरम्यान १३ नोव्हेंबरलाच प्रवीणकुमार सोनी व त्याच्यासोबत अन्य पाच जण युवतीला घेण्यासाठी राजस्थानातून शहरात आल्याची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी त्यांना अटक केली. त्या युवतीची सिरोई येथील प्रवीणकुमार सोनी याच्याकडून दीड लाख रुपये घेवून दलालांनी लग्न लावून दिल्याची माहिती समोर आली आहे. 

 

पोलिसांनी प्रवीणकुमार सोनी व त्याच्या सहकाऱ्यांकडून माहिती घेतली असता अकोल्यातील दोन महिलांनी या प्रकरणात दलाली केल्याची माहिती मिळाल्यामुळे शुक्रवारी रात्री फ्रेजरपुरा पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. याच प्रकरणात आणखी अशोक गायकवाड, अमर इंगळे, नरेशकुमार गोस्वामी, अंकुश कांबळे आणि अनिता साठे हे पाच जण अजूनही पसार आहे. असून या पाच जणांचा शोध सुुरू आहे. अशी माहिती प्रकरणाचे तपास अधिकारी पीएसआय बालाजी लालपालवाले यांनी दिली आहे. 

 

चार ते पाच युवतींची विक्री झाल्याचा अंदाज 
पोलिसांनी पकडलेल्या नऊ जणांपैकी अग्रवाल हा मुख्य दलाल आहे. त्याने मागील दीड ते दोन वर्षात जवळपास चार ते पाच मुलींना या भागातून राजस्थानात नेवून विक्री केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे येत आहे. मात्र पसार आरोपी पकडल्यानंतर याप्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होणार असल्याचे पीएसआय लालपालपाले यांनी सांगितले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...