आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या गाडीत प्रेयसीने प्रियकराला जाळले, म्हणाली- मी गरोदर आहे, तो मला मारण्याचा प्लॅन करत आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची(झारखंड)- रातूच्या झखराटांडजवळ गाडीतून जात असताना प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ठाकुरगावचा रहिवासी असलेला दीपक साहू यात गंभीररित्या भाजला आहे. त्याचा चेहरा, हात आणि खांदे जळाले आहेत. त्याला सध्या रिम्समध्ये भर्ती केले आहे. या घटनेत व्हॅन पूर्णपणे जळाली आहे. आग लावणाऱ्या आरोपी तरूणीचे नाव सुशिला आहे.


पोलिसांना घटनास्थळी तरूणीचे एक पत्र मिळाले आहे
पोलिसांनी घटनास्थळावरून एक पत्र जप्त केले आहे, त्यात लिहीले आहे की, मी गरोदर आहे. माझ्या आयुष्यात एक नवीन जीव येणार आहे. मी खूप खुश आहे. मी दिपकला याबद्दल सांगितले तेव्हा तो म्हणाला, आपला जीव वाचवायचा असेल तर कोणालाही सांगू नकोस नाहीतर जीवे मारेल. दुसरीकडे दिपकचा भाऊ राजूने सांगितले की, तरूणी दिपकला पैशांसाठी ब्लॅकमेल करत आहे. मागील एक आठवड्यांपासून जाळून मारण्याची धमकी देत होती.

 

आधी वाद झाला, नंतर जाळले
मिळालेल्या माहितीनुसार व्हॅनमधून दीपक साहू आणि सुशीला कुमारी ठाकुरगाववरून रातूकडे जात होते. व्हॅनमध्ये पेट्रोलने भरलेली बाटली होती. चालू गाडीत आधी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सुशिलाने दिपकवर पेर्टोल टाकले आणि आग लावली. त्यानंतर गाडीतून उडी मारून पळून गेली. आग लागलेली गाडी पाहून लोकांनी आग विझविली आणि दिपकला वाचवले.