आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - ब्रिटनच्या लिंकनशायर येथे एका तरुणीने आपली आपबिती मांडली आहे. ती फक्त 3 वर्षांची होती तेव्हापासून तिच्या नरकयातना सुरू झाल्या. इतक्या लहान वयात आपल्यासोबत काय घडते याची तिला जाणीवही नव्हती. 12 वर्षांची झाली तेव्हा तिने आपल्या भावाच्या बळजबरीला विरोध केला. परंतु, आई-वडिलांना सांगण्याचे धाडस करू शकली नाही. आरोपी तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा होता. तब्बल 10 वर्षे भावाचा अत्याचार सहन केल्यानंतर तिने अखेर आपल्या आईला ही गोष्ट सांगितली. तसेच दोघींनी मिळून आरोपीला तुरुंगात पाठवले. लाज किंवा संकोच या गोष्टींमुळे आपल्यासारख्या कित्येक मुली शांत राहतात. त्यांनाच धाडस देण्यासाठी आपण ही कहाणी शेअर करत आहोत असे मायलेकींनी सांगितले आहे.
तरुणीने सांगितल्याप्रमाणे, तिला कळतही नव्हते तेव्हापासून खेळता-खेळता तिचा भाऊ तिच्यासोबत अश्लील वर्तन करायचे. मोठी होत असताना त्याचे हे अश्लील चाळे वाढत गेले. ती 12 वर्षांची होती तेव्हा तिला आपल्यासोबत काहीतरी वाइट घडत आहे असे कळाले. भाऊ तिच्याजवळ आला तेव्हा तिने त्याचा तीव्र विरोध केला. परंतु, मोठे असल्याचा गैरफायदा घेत त्याने दमदाटी केली आणि अत्याचार सुरूच ठेवले. त्याचवेळी तिने आपल्या आईला यासंदर्भात तक्रार केली असती तर अत्याचार तेव्हाच थांबला असता. परंतु, भाऊ मोठा असल्याने त्याची भीती म्हणा की आईला ही गोष्ट नक्की सांगायची तरी कशी या लाजेपोटी ती शांत होती. हीच तिची सर्वात मोठी चूक ठरली आणि तिचे अख्खे लहानपण उद्ध्वस्थ झाले.
ती 18 वर्षांची झाली तेव्हा तिने आरोपीला धडा शिकवण्याचा ठाम निर्णय घेतला आणि आईला संपूर्ण गोष्ट सांगितली. आपल्या चिमुकलीवर अत्याचार होतोय ही गोष्ट तिच्यासाठी खूप मोठा धक्का होता. पण, आरोपी आपलाच मुलगा आणि तिचा सख्खा भाऊ असल्याचे कळाले तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली. आई सांगते, आपल्या मुलाच्या अमानवीय कृत्यांसाठी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेण्यात तिने थोडासाही संकोच केला नाही. तिने आपल्या मुलीसोबत जाऊन थेट पोलिस स्टेशन गाठले आणि दोघींनी या अत्याचाराची तक्रार दाखल केली. कोर्टाने 2014 मध्ये आरोपीला दोषी ठरवून 9 वर्षांची कैद सुनावली. तसेच तो सध्या तुरुंगातच आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.