आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • I Was Delighted To Be Reunited With My Biological Dad… But Then He Se xually Abused Me And Posted Na ked Photos Of Me On Instagram

खऱ्या बापाला भेटून खूप खुश होती टीनेज गर्ल, सोबत राहायलासुद्धा गेली, पण माहिती नव्हते की नरकात जात आहे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही कहाणी 'सोशल व्हायरल सिरीज'अंतर्गत आहे. जगभरात सोशल मीडियावर अशा स्टोरीज व्हायरल झाल्या आहेत, ज्यांची तुम्हाला माहिती असली पाहिजे.)

 

हेस्टिंग्स - इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका किशोरवयीन मुलीने आपल्यावरील झालेल्या अत्याचारांची कहाणी शेअर केली आहे. या मुलीने सांगितले की, आपल्या खऱ्या बापाचा शोध घेतल्यानंतर तिचे आयुष्य नरकापेक्षाही भयंकर झाले. तिच्या बापाने तिला कोंडूनच ठेवले नाही, तर तिचे लैंगिक शोषणही केले. एवढेच काय, त्याने आपल्या मुलीचे शेकडो न्यूड फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले. अत्याचारांचे हे सत्र तब्बल 16 महिने सुरू होते. तिने जेव्हा पोलिसांत याबाबत तक्रार दिली, तेव्हा नराधमाला अटक झाली. न्यायालयाने या राक्षसी बापाला 13 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.

 

बापाला पहिल्यांदा भेटताच झाली होती इमोशनल
- ही स्टोरी इंग्लंड हेस्टिंग्स शहरात राहणाऱ्या स्टेफनी डियर्सले या मुलीची आहे. स्टेफनी जेव्हा 5 वर्षांची झाली तेव्हा तिला कळले की, तिच्या पालकांनी तिला दत्तक घेतलेले होते. यानंतर जून 2015 मध्ये तिच्या 14व्या वाढदिवशी तिच्या पालकांनी तिच्या खऱ्या आईबापांनी पाठवलेली अनेक पत्रे दाखवली. यानंतर तिने आपल्या खऱ्या आईवडिलांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.
- स्टेफनीने फेसबुकच्या मदतीने लवकरच आपले वडील बॅरी जॅक्सनला शोधले आणि मग त्यांना मेसेज करत आपल्याबाबत सर्वकाही सांगितले. स्टेफनी म्हणाली की, 'पहिल्यांदाच जेव्हा माझ्या खऱ्या वडिलांना पाहिले तेव्हा खूप भावुक झाले होते. यानंतर त्यांनी मला माझी आई ज्युलीची (48) भेट घातली. ते म्हणाले की, आता ते दोघेही एकत्र राहत नाहीत, परंतु अजूनही चांगले मित्र आहेत. मला कळले की, मला 4 भाऊ-बहिणीही आहेत.'
- सप्टेंबर 2015 मध्ये बेरी, स्टेफनीला घेऊन स्कॉटलंडला सुट्या घालवण्यासाठी गेला. येथे त्याने आपल्या मुलीची खूप काळजी घेतली. तो दररात्री तिला डिनरवर घेऊन जायचा. तेथे त्याने स्टेफनीला अनेक गिफ्ट्सही दिले. ज्यात कपडे, परफ्यूम आणि रोख रक्कमही होती. स्टेफनीच्या मते, ती तेव्हा खूप आनंदात होती.
- स्कॉटलंडवरून परतल्यानंतर काही आठवड्यांनी बेरीने स्टेफनीला आपल्यासोबत राहण्यासाठी सांगितले. परंतु पालकांनी हा खूप घाईचा निर्णय असल्याचे सांगून स्टेफनीला असे करण्यास नकार दिला. परंतु ती ऐकली नाही आणि बॅग पॅक करून बॅरीच्या घरी निघून गेली.

 

शिफ्ट झाल्याच्या काही दिवसांनीच बदलली परिस्थिती
- स्टेफनी म्हणाली की, तेथे गेल्यानंतर काही दिवस खूप आनंदात गेले. या काळात आम्ही नेहमी एकत्र रात्रीचे जेवण तयार करायचो आणि भरपूर गप्पा मारायचो. पण काही आठवड्यांतच सर्वकाही बदलून गेले.
- 'एका सकाळी जेव्हा मी ब्रेकफास्ट तयार करत होते, तेव्हा डॅड किचनमध्ये आले आणि त्यांनी माझ्या हिप्सला चिमटा घेतला. मला धक्काच बसला, मी ताबडतोब त्यांचा हात झटकला. यानंतर ते म्हणाले की, गंमत केली तुझी. तेव्हा मला वाटले की, हे पुन्हा होणार नाही.' 
- 'एका दिवशी शाळेतून घरी येताच त्यांनी मला पकडले आणि माझ्या छातीला ते टच करू लागले. यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री त्यांनी मला त्यांच्यासोबत बेडरूममध्ये झोपण्यास बोलावले. त्यांचे म्हणणे होते की, त्यांना अंधारात भीती वाटते.' स्टेफनी सांगते, आता तिलाच त्यांची भीती वाटू लागली होती.
- डिसेंबर 2015 मध्ये एका रात्री बेरी नशेतच घरी आला आणि त्याने स्टेफनीला पकडून किस करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तो फरशीवर पडला आणि तिच्यावर बलात्कार केला. स्टेफनी पूर्ण ताकद लावूनही त्याचा विरोध करू शकली नाही.
- या घटनेच्या दुसऱ्या दिवशी बेरीने स्टेफनीला धमकी दिली की, तू याबाबत कुणालाही काही सांगशील तर तुला आणि तुझ्या पॅरेंट्सना जिवंत सोडणार नाही. यानंतर स्टेफनीने शाळेत जाणे बंद केले.

 

शेवटी पोलिसांना दिली माहिती
- स्टेफनी म्हणाली की, यानंतर तिच्या आयुष्यातील पुढचे 16 महिने एखाद्या नरकापेक्षा कमी नव्हते. बेरीला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तो तिचा भोग घ्यायचा. ती त्याच्यासाठी एक खेळणेच बनली होती. त्याला जेव्हाही घराबाहेर जायचे असेल, तो स्टेफनीला घरात कुलूपबंद करून ठेवायचा.
- जानेवारी 2017 मध्ये स्टेफनीने विचार केला की, आता ती आपल्या बापाचे अत्याचार बिलकूल सहन करणार नाही. तिने पोलिसांना फोन करून सर्वकाही सांगून टाकले. पोलिस आल्यावर पुरावा म्हणून तिने आपला ड्रेसही दिला. यानंतर आरोपी बेरीला अटक करण्यात आली.
- कोर्टात सुनावणी दरम्यान स्टेफनीला हेसुद्धा कळले की, बेरीजवळ तिचे शेकडो न्यूड फोटो होते, जे त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेटर केलेले होते. या फोटोंमध्ये तिचे झोपलेले आणि अंघोळ करतानाचे फोटोही होते. याबद्दल स्टेफनीला तोपर्यंत काहीही माहिती नव्हती.
- डिसेंबर 2017 मध्ये कोर्टाने बेरी जॅक्सन (38) ला दोषी ठरवत 13 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली. यादरम्यान स्टेफनीला दत्तक घेणाऱ्या पालकांनी तिला भक्कम पाठिंबा दिला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video व Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...