आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहजहांपूर- येथील एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ज्या दिवशी मुलीने गळफास घेतला त्या दिवशी ती रात्रभर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत होती. सकाळी मुलगा घरातून निघून गेला, त्यानंतर मुलाची बहिण रूममध्ये आली तेव्हा तिला मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. होळीनंर दोघांचे लग्न होणार होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे.
घटनेच्या वेळी मुलाच्या घरात नव्हते कोणी
- मुळ सीतापूरचे रहिवासी असलेले शिवपाल सिंह आपल्या कुटुंबासोबत दिल्लीत राहत होते. तिथे त्यांच्यासोबत त्यांचा एक नातलग बदाम सिंहदेखील काम करत होता. शिवपाल यांनी आपली मुलगी श्रुतीचे लग्न बादाम सिंहसोबत ठरवले होते. होळीनंतर लग्न होणार होते. होळीनिम्मीत शिवपाल आपल्या कुटुंबासोबत सीतापूरला गेले होते. बादामदेखील शाहजहांपुरला आपल्या घरी आला होता. बादाम सिंहची आई होळी निमीत्त आपल्या नातलगांना भेटायला गेली होती. या दरम्यान बादाम घरात एकटा होता, त्यामुळे त्याने श्रुतीला आपला घरी बोलावले. दोघांनी रात्र सोबत काढली, नंतर सकाळी बादाम बाहेर निघून गेला. त्यानंतर बादामची बहिण घरी आली तव्हा तिने श्रुतीला लटकलेल्या अवस्थेत पाहीले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले, पोलिसांना श्रुतीच्या खिशात एक शाहजहांपूर ते सीतापूरचे बस तिकीट मिळाले आहे. पोलिसांनी सध्या पुढील तपास सुरू केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.