आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Suicide: मैत्रिणीला म्हणाली, फिरण्याचा मूड नाही तू ये; परतली तेव्हा पंख्याला लटकला होता मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - येथील बीएडच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. मैत्रिणी फिरण्यासाठी जात असताना तिने आपला मूड नसल्याचे सांगितले होते. ती एकटीच रुममध्ये थांबली होती. मैत्रिणी परतल्या तेव्हा दार उघडलेच नाही. यानंतर त्यांनी वार्डनला बोलावले. सर्वांनी मिळून दार उघडल्यानंतर आतील दृश्य पाहू तिची मैत्रिण बेशुद्धच पडली. आत्महत्या करणारी विद्यार्थिनी मूळची दिल्लीची रहिवासी होती. 


प्रियकराशी भांडणानंतर उचलले टोकाचे पाऊल...
कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्टेलमध्ये कीर्ति सागर (23) डीजी कॉलेज येथून बीएड करत होती. तिने पंख्याला गळफास घेऊन आपला जीव दिला. एका मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे, "जेवणानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी बाहेर फिरण्यासाठी जात होतो. मी कीर्तीला बोलावण्यासाठी गेले तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तिचे बॉयफ्रेंडशी भांडण झाले होते. त्यामुळेच, ती अपसेट होती. आम्ही रुमवर परतलो तेव्हा आतून दार बंद होते. प्रतिसाद मिळाला नसल्याने वार्डनला बोलवावे लागले. दार उघडले तेव्हा कीर्तिचा मृतदेह पंख्याला लटकला होता. ते दृश्य पाहून मला चक्कर आले होते. दुसऱ्या मैत्रिणींनी माझ्या चेहऱ्यावर पाणी मारले तेव्हा मी शुद्धीवर आले." दरम्यान, यासंदर्भातील माहिती तिचया पालकांनाही देण्यात आली आहे. पोलिसांनी सुद्धा या प्रकरणाला प्रेम प्रकरणाचा अँगल देऊन तपास सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...