आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girl Student Hit By Car At Jogeshwari Captured In Camera

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भरधाव कारने विद्यार्थिनीला दिली जोरदार धडक; तरुणी फेकली गेली हवेत, सध्या आहे कोमात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जोगेश्वरीतील एक भीषण अपघात कॅमेर्‍यात कैद झाला आहे. रस्त्याच्या शेजारुन जाणार्‍या एका विद्यार्थिनीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. विद्यार्थिनी हवेत‍ फेकली जाऊन समोरील झाडावर आदळली. तरुणीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून ती सध्या कोमात आहे.

 

सायली असे अपघातात जखमी तरुणीचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता.31) घडली. सायली कोचिंग क्लासहून घरी परत जात होती. यादरम्यान मागून आलेल्या भरधाव कारने सायलीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की सायली हवेत फेकली गेली. नंतर ती समोरील झाडावर आदळली. अपघातानंतर आरोपी कार घेऊन फरार झाले आहेत. ही घटना रस्त्यावर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. पोलिसांनी कारचा क्रमांकही ट्रेस केला आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांग‍ितले आहे.