Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | girl student porn photo viral on Social Media case filed in Amaravati

प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी, 'तसले' फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल

प्रतिनिधी | Update - Jan 15, 2019, 12:41 PM IST

पीडितेला दुचाकीवर बसवून एका रुमवर घेऊन गेला. तेथे त्याने तरुणीसोबत काढलेले छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल केले.

  • girl student porn photo viral on Social Media case filed in Amaravati

    अमरावती- महाविद्यालयीन तरुणीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाबु नारायण अलोकर (रा. रजनीकुंड, ता. चिखलदरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    पीडित महाविद्यालयीन तरुणी 19 नोव्हेंबर रोजी महाविद्यालयासमोरून जात असताना आरोपी बाबु अलोकर दुचाकीवर आला. त्याने पीडितेला दुचाकीवर बसवून एका रुमवर घेऊन गेला. तेथे त्याने तरुणीसोबत काढलेले छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल केले. यासोबतच बाबुने तरुणीला संबंध ठेवण्याबाबत धमकीही दिली. दरम्यान तरुणीने सदर घटना वडीलांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही देऊन रुममधील संभाषणही रेकॉर्ड केले. यामुळे घाबरलेल्या तरुणीने रविवारी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून बाबू अलोकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Trending