आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेड काढणा-या भामट्यास विद्यार्थिनींनी शिकवला धडा, चपलेने चोप देत पोलिस ठाण्‍यापर्यंत काढली धिंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - सेलू येथील बसस्थानकावर दुपारी एक वाजेच्‍या सुमारास विद्यार्थींनीची छेड काढणा-या एका तरूणाला विद्यार्थीनींनी चपलेने बेदम मारहाण केली. माहितीनूसार, बसस्‍थानकावर 3 तरूण विद्यार्थीनींशी छेडछाड करत होते. मात्र त्‍यापैकी 2 तरूण तेथून निसटण्‍यात यशस्‍वी झाले. तावडीत सापडलेल्‍या एकाला विद्यार्थींनीनी चांगलाच चोप दिला.


घटनेवेळी बसस्थानकावर पोलीस उपस्थित नसल्यामुळे अनेक विद्यार्थींनीनी या तरूणावरील आपला राग काढला. स्‍थानिकांनी दिलेल्‍या माहितीनूसार, सेलू बसस्थानकावर छेडछाडीचे प्रकार नेहमी चालूच असतात. मात्र तक्रारच होत नसल्याने छेडछाड करणाराचे फावते.

 

विद्यार्थिनींच्‍या तावडीत सापडलेल्‍या तरूणाला मारहाण करण्‍याचा प्रकार जवळपास तासभर सुरू होता. त्‍यानंतर पोलिस घटनास्‍थळी हजर झाले. मात्र विद्यार्थीनींनी या तरुणास पोलीसाच्या स्वाधीन करण्यास नकार दिला. त्‍यांनी बसस्थानक ते पोलीसठाण्यापर्यंत तरूणास मारहाण करत त्‍याची धिंड काढली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या तरुणास वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात नेले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...