आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांच्या मुलासोबत अल्पवयीन मुलीला घरात ठेवून बाजारात गेली महिला, घरी परतल्यावर मुलगी उघडत नव्हती दार, शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडून आत गेली, समोरचे दृष्य पाहून बसला धक्का...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साओ रोके- ब्राझीलमध्ये एका अल्पवयीन मुलीने आपल्या 5 वर्षांच्या भावाचा आधी गळा दाबून जीव घेतला आणि नंतर त्याच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे केले. इतक्यावरच न थांबता तिने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून तो खाल्ला. त्यांची आई त्या दोघांना घरी सोडून बाजारात गेली होती. महिला घरी परतल्यावर मुलगी दार उघडत नव्हती, त्यानंतर महिलेने लोकांच्या मदतीने दार तोडले आणि घरात गेली, तेव्हा तिला घडलेला सगळा प्रकार समजला.


छिन्न-विछीन्न अवस्थेत मिळाला चिमुकल्याचा मृतदेह
- घटना साओ रोके शहरातली आहे. 18 वर्षीय मुलगी करीनाची आई 5 वर्षांच्या मुलाला करीनाच्या जबाबदारीवर सोडून बाजारत गेली होती. 
- महिला थोड्या वेळाने घरी परतल्यावर मुलगी दार उघडत नव्हती. त्यानंतर महिलेने लोकांच्या मदतीने दार तोडले आणि आत गेली.
- आत गेल्यावर तिला छिन्नविछीन्न अवस्थेत मॅकॉनचा मृतदेह आणि त्याच्या बाजुला अनेक मेणबत्या मिळाल्या. शिवाय त्याची बहीण करीना मृतदेहाच्या बाजुलाच उभी होती. 
- पोलिसांनी सांगितले की, मुलाच्या अंगावर अनेक जखमांचे निशान होते. त्याचे शीर कापून वेगळे केले होते, हात कापले होते, डोळे फोडले होते आणि पाय जाळले होते.
- त्यासोबतच करीनाने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून खाल्ला. घटनास्थळावरून जळालेला एक सेल फोन, मेमरी कार्ड, चाकू आणि गांदादेखील मिळाला आहे.


खेळण्याचा बहाण्याने रूममध्ये नेले
- करीनाने पोलिसांना सांगितले की, खेळण्याच्या बहाण्याने तिने त्याला रूममध्ये नेले. तिथे तिने आधी उशीच्या साहाय्याने त्याचा गळा दाबला आणि नंतर शरीराचे तुकडे केले.
- घटनेनंतर करीना खूप रागात होती आणि तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होती, पण लोकांनी कसेबसे तिला ताब्यात ठेवले.


पोलिसांना काळ्जा जादूचा संशय
- पोलिसांना या प्रकरणात काळ्या जादुच्या संशय वाटत आहे. त्यांना वाटते की, घटनास्थळावरून मिळालेला फोन अनोळखी व्यक्तीचा आहे आणि त्याच्या मदतीनेच करीनाने हे कृत्य केले असावे. 
- पोलिस सध्या तपास करत आहे की, करीना सोशल मीडियाच्या माध्यामातून सॅटेनिस्ट आणि ब्लॅक मॅजिकची प्रॅक्टिस करणाऱ्या ग्रुपच्या संपर्काततर नाहीये ना.