आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूममेटने भिंतीवर लावले अजब चेह-यांचे फोटो, मुलीला वाटले तिच्‍या फेव्‍हरेट सिंगर्सचे असतील, मात्र भितीदायक होते त्‍यामागचे सत्‍य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खबरे जरा हटके - ही कहाणी अशा मुलीची आहे, जी अॅडमिशनंतर युनिवर्सिटीमध्‍ये पोहोचली तेव्‍हा तिचा सामना एका विचित्र रूममेटशी झाला. रूममेटने खोलीत काही अजब चेह-यांचे फोटो लावले होते. मुलीला वाटले की हे फोटो तिच्‍या फेव्‍हरेट सिंगर्सचे असतील. मात्र जेव्‍हा तिला यामागील भीतीदायक सत्‍य समजले तेव्‍हा तिने ताबडतोब ती खोली खाली केली.


काय होते त्‍या फोटोमागील सत्‍य
- या घटनेला एका मुलीने सोशल मीडियावर शेअर केले आहे. मात्र तिने आपली ओळख सांगितलेली नाही.
- मुलीला युनिर्व्‍हसिटीमध्‍ये येऊन केवळ 3 आठवडे झाले होते. तेव्‍हाच तिची भेट रूममेट लीनशी झाली होती. लीनने रूममध्‍ये येताच खोलीत काही अजिब चेह-यांचे फोटो लावले. मुलीला वाटले की, ते लीनच्‍या फेव्‍हरेट इंडी रॉक स्‍टार्सचे पोस्‍टर्स असतील.
- मात्र मुलगी जसा विचार करत होती तसे ते फोटो नव्‍हते. लीनने तिच्‍यापासून एक भितीदायक गोष्‍ट लपवून ठेवली होती. एकेदिवशी जेव्‍हा मुलीचा मित्र खोलीत आला तेव्‍हा त्‍याने सांगितले की, हे सर्व फोटो सीरियल किलर्सचे आहेत.

 

लीनने पोस्‍टर्स हटवण्‍यास दिला नकार
- मुलीने सांगितले की, 'मला वाटायचे कि लीन एक हिप्‍पी आहे. तिने भिंतीवर रॉकस्‍टार्सचे पोस्‍टर लावले आहेत. मात्र एकेदिवशी जेव्‍हा माझा मित्र खोलीत आला तेव्‍हा त्‍याने सांगितले की, हे सर्व पोस्‍टर्स सीरीयल किलर्सचे आहेत.'
- नंतर मुलीने लीनला ते सर्व फोटो हटवण्‍यास सांगितले होते. मात्र ते हटवण्‍यास लीनने नकार दिला. तसेच हे फोटो तिने का लावले, हे सांगण्‍यासही तिने नकार दिला.
- फोटोंमागचे सत्‍य कळाल्‍यानंतर मुलगी रूममध्‍ये भितभितच राहू लागली. लवकरच तिने रूमही सोडली. तसेच लीनशी बोलणेही बंद केले.
- मुलीने सांगितले आहे की, 'फोटोंचे सत्‍य कळाल्‍यानंतर मला लगेच रूम सोडायची होती. मात्र तेव्‍हा हॉस्‍टेलमध्‍ये कोणतीच रूम खाली नव्‍हती. त्‍यामुळे मी मैत्रीणीच्‍या खोलीत झोपायला जायचे.
- 'मला हॉरर सिनेमे अजिबात आवडत नाहीत. मला प्रचंड भिती वाटते. अशात मी अशा मुलीसोबत कशी काय राहू शकते जिचे फेव्‍हरेट स्‍टार्स सिरियल किलर्स असतील.' 

बातम्या आणखी आहेत...