Home | International | Other Country | girl tops all subjects in school father had to borrow to fulfil his promise in UK

Inspiring: गरीब बापाने लेकीला केलं चॅलेंज- पास झालेल्या विषयासाठी 100 युरो देईन, निकाल पाहून हसत-हसत काढले कर्ज!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 28, 2018, 04:34 PM IST

छोटीशी नोकरी करणाऱ्या वडिलांनी जेवढ्या विषयात टॉप करशील त्या प्रत्येक विषयासाठी 100 युरो देईन असे आश्वासन दिले होते.

 • girl tops all subjects in school father had to borrow to fulfil his promise in UK

  वेल्स - मराठी चित्रपट ताऱ्यांचे बेट आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिला असेल. अभ्यासात ढ असलेल्या मुलाला वळणावर आणण्यासाठी गरीब बाप त्याला टॉप करशील तर मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात घेऊन जाऊ असे आश्वासन देतो. वडिलांची ऐपत नसतानाही इतके मोठे आश्वासन मिळाल्यानंतर तो मुलगा खरंच टॉप करून वडिलांना धक्का देतो. तशीच एक सत्यघटना ब्रिटनमध्ये घडली आहे. भारत असो की ब्रिटन पालक ते पालकच असतात. येथील वेल्स शहरात राहणारी आणि दहावीला असलेली मॉली शिक्षणात खूपच ढ होती. वारंवार सांगूनही अभ्यास करत नव्हती. छोटीशी नोकरी करणाऱ्या तिच्या वडिलांनी 14 पैकी जेवढ्या विषयात टॉप करशील त्या प्रत्येक विषयासाठी 100-100 युरो देईन असे आश्वासन दिले होते. आणि त्या मुलाने सर्वच विषयांमध्ये टॉप करून आपल्या प्रांतात इतिहास घडवला. आता या मुलीला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांना कर्ज काढावे लागले आहे.


  लेकीने इतिहास रचला...
  > वेल्समध्ये राहणारे क्लीव्ह रोलंड (58) यांची मुलगी मॉली (16) अभ्यास मागे असल्याने प्रत्येक जण तिला चिडवत होते. मॉली दिसताच लोक तिच्या अभ्यासाचा विषय काढायचे. परीक्षा म्हटले की तिला टेन्शन यायचे. अशात मॉली डिप्रेस झाली होती. तिने लोकांना बोलणे सुद्धा कमी केले होते. अशात तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी वडील क्लीव्ह यांनी तिच्यासमोर एक ऑफर ठेवली. 14 पैकी तू ज्या-ज्या विषयांमध्ये टॉप करशील त्या प्रत्येक विषयासाठी तुला 100 युरो (8100 रुपये) देईन असे त्यांनी आश्वस्त केले.


  > मॉलीने सांगितल्याप्रमाणे, परीक्षेचा निकाल चांगला लावण्यासाठी तिने दिवस-रात्र एक करून मेहनत केली. तिने खेळणे आणि मित्र-मैत्रिणींच्या भेटी-गाठी घेणे सुद्धा बंद केले होते. परीक्षा देताना तिला चांगले मार्क मिळवण्याची अपेक्षा होती. परंतु, आपण टॉप करू असे तिला वाटलेच नव्हते. निकाल हाती लागला तेव्हा दुसऱ्यांपेक्षा मोठा धक्का आपल्यालाच बसला असे मॉली सांगते. तिने सर्वच्या-सर्व 14 विषयांमध्ये टॉप केले. शाळेच्या माहितीप्रमाणे, आतापर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याने त्यांच्या शाळेत इतके चांगले मार्क मिळवलेले नाहीत. तिने खरोखर इतिहास घडवला आहे.


  वडिलांना काढावे लागले कर्ज
  क्लीव्ह यांनी सांगितल्याप्रमाणे, मॉलीचा निकाल पाहून माझे डोळे पाणावले. कितीही मोठे आश्वासन दिले तरी आपली मुलगी एक किंवा दोन विषयांमध्ये टॉप करू शकेल असे त्यांना वाटले होते. सर्वच विषयांमध्ये ती नंबर एक राहील याचा त्यांनी विचारही केला नव्हता. "तिच्या एक दोन विषयांसाठी 100 ते 200 युरो मी तयार ठेवले होते. परंतु, मी एक छोटीशी नोकरी करतो. त्यातून येणाऱ्या कमाईत घर चालवणेच अवघड आहे. अशात 1400 युरो (1.3 लाख रुपये) कुठून आणणार असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला होता." त्यामुळे मुलीला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या मित्रांकडून उसणे घेतले आहेत. याच रकमेतून तिने पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

 • girl tops all subjects in school father had to borrow to fulfil his promise in UK
 • girl tops all subjects in school father had to borrow to fulfil his promise in UK

Trending