आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेली होती पत्नी, पतीने आईसोबत मिळून केली मारहाण; ओढणीने आवळला गळा, या कारणामुळे करत होते सूनेचा छळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पानिपत : सोनीपत येथे शुक्रवार रोजी पैशाच्या मागणीसाठी इंजीनिअर पती, सासू आणि इतरांनी सूनेला मारहाण करत तिचा छळ केला. सर्वांनी मिळून ओढणीने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. नंतर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याच्या तावडीतून सुटून आपला जीव वाचवला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पीडितेला पानिपत येथील रूग्णालयात दाखल केले आहे. 


पीडितेच्या वडिलांना सांगितले की, गेल्या वर्षी त्यांची मुलगी 23 वर्षीय आरतीचा विवाह प्रेम नगर, सोनीपत येथील युवकासोबत झाला होता. आरतीचा पती दिल्ली येथे एका खासगी कंपनीत इंजीनिअर आहे. आरतीने आरोप केला की, सासरचे लोक हुंडा कमी दिला म्हणून सतत माझ्यासोबत छळ करत होते. ते नेहमीच 10 लाख रूपयांची मागणी करत होते. शुक्रवारी सकाळी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असता नवऱ्याने गिझर बंद केला. त्यानंतर माझ्यासोबत वाद घालत मला मारहाण केली. सासू आणि घरातील सदस्यांनी पतीलाच साथ दिली. तसेच ओढणीने गळा आवळण्याच प्रयत्न केला असल्याचा आरतीने आरोप केला आहे. 

 

आरोपी नेहमीच करायचे छळ
पीडिताच्या वडिलांचे म्हणणे आहे की. आरतीला मारहाण करत असताना तिने आम्हाला फोन केला. तिच्या ओरडण्याची फोनवर रेकॉर्डिंग आहे. याआधी आरोपींनी अनेकवेळा आरतीला मारहाण केली आहे. याबाबत 5 ते 6 वेळेस बैठक देखील झाली आहे. 17 डिसेंबर रोजी सुद्धा पोलीस ठाण्यात बैठक झाली होती. पण पोलिसांनी समज देत ही तडजोड केली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...