Home | National | Other State | Girl tried suicide on railway track, girl and boy friendship on Facebook in Chhattisgarh

प्रियकरासाठी आई-वडिलांच्या विरोधात गेली मुलगी, त्याच्या एका गोष्टीमुळे झाली नाराज म्हणून आत्महत्येसाठी रेल्वे ट्रॅकवर झोपली...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 12:04 AM IST

एैनवेळी घटनेत आला ट्विस्ट.

 • Girl tried suicide on railway track, girl and boy friendship on Facebook in Chhattisgarh

  जांजगीर(छत्तीसगढ)- फेसबूकवरून एक मुलगा आणि मुलीत मैत्री झाली, आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलीला मुलासोबत लग्न करायचे होते म्हणून ती त्याला भेटायला बाराद्वारला गेली. मुलाने आधी घरच्यांना लग्नासाठी मनवावे लागेल आणि त्यानंतरच लग्न करता येईल असे सांगितले. त्यानंतर ती मुलगी रेल्वे ट्रॅकवर गेली. पण वेळ प्रसंगी पोलिसांनी तिला वाचवले.


  या घटनेनंतर मुलीने अशा घाबरणाऱ्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिला. बाराद्वार पोलिस आधिक्षक राजकुमार लहरे यांनी सांगितले की, बाराद्वारच्या वार्ड नंबर 6 मध्ये राहणारा प्रवीण कुमार बरेठ दोन वर्षांपूर्वी शिक्षण करण्यासाठी बिलासपूरला गेला होता. तिथे त्याची फेसबूकवरून एका मुलीसोबत मैत्री झाली, आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर मुलगी त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी घर सोडून त्याला भेटायला गेली. दोघांची भेट रेल्वे स्टेशनवर झाली आणि मुलीने लग्न करण्याचा हट्ट केला. मुलाने घरच्यांचा नकार असल्यामुळे लग्न करण्याच नकार दिला.

  अब्रु जाईल या भितीने करत होती आत्महत्त्या
  तिने मुलाला सांगितले की, त्याच्यासोबत लग्न करण्यासाटी ती घर सोडून आली आहे आणि वापस गेली तर तिची अब्रु जाईल. त्यानंतर तिने आत्महत्त्या करण्याचा विचार केला आणि रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसली. त्यानंतर मुलाने 112 नंबरवर फोन करून माहिती दिली आणि पोलिसांनी तिला वाचवले.


  आता नाही करायचे लग्न
  पोलिसांनी तिला वाचवल्यानंतर घरच्यांना सुचना दिली. त्यानंतर तिची काउंसलींग करण्यात आली. एसआय श्री लहरे यांनी सांगितले की, त्यानंतर युवतीने लग्न करण्यास नकार दिला. आणि आपल्या घरच्यांसोबत परत घरी गेली.

Trending