आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Girl Was Called To Show Meerut's Ghantaghar Showed In Film Zero, Then Abused By Three Boys

'झिरो' सिनेमातील घंटाघर दाखवण्याच्या बहाण्याने अल्पनयीन मुलीला बोलवले मेरठला, हॉटेलमध्ये बंदी बनवून तीन मुलांनी केला बलात्कार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ(उत्तर प्रदेश)- शाहरुख खानचा सिनेमा 'झिरो' मधील घंटाघर चौक दाखवण्याच्या बहाण्याने एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन युवकांनी सामुहीक बलात्कार केला. कसेबसे तिने त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि पोलिस ठाणे गाठले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केले आहे.

 

पिडीत मुलगी दिल्लीच्या चांदनी महल परिसरातील आहे. तिची मेरठमधील शाहरूख नावाच्या मुलासोबत फेसबूकवरून मैत्री झाली. ते दोघे रोज तासंनतास गप्पा मारायचे, त्या दरम्याने शाहरूखने तिला सांगितले, शाहरूख खानचा सिनेमा झिरोमध्ये दाखवलेले घंटाघर मेरठमध्ये आहे. हे ऐकून ती घंटाघर पाहण्यासाठी उत्साहीत झाली. त्यानंतर ती आरोपीच्या सांगण्यावरून मेरठला गेली.

 

तेथे आरोपीने तिला दिल्ली रोडवरील एका हॉटेलमध्ये बंदी बनवून ठेवले आणि आपल्या मित्रांसोबत मिळून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. मुलीने कसेबसे स्वत:ची सुटका करून घेतली आणि थेट पोलिस ठाणे गाठले आणि आरोपींविरू्दध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुख्या अरोपी शाहरूखला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...