National Crime / मित्रमैत्रिणींसोबत टूरवर गेली होती, पाच दिवसांनंतर अशा अवस्थेत सापडली तरुणी, पोलिसांना सांगितली आपबिती


पोलिसांनी सांगितल्यानुसार पीडित तरूणी रेवाडी जिल्ह्याची रहिवासी आहे

दिव्य मराठी वेब

Jun 19,2019 04:04:02 PM IST

जयपूर(राजस्थान)- फिरायला आलेल्या तरुणीवर मित्रांनी सामुहिक बलात्कार करून रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीने श्यामनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी संजय, सुनिता आणि नरेशविरूद्ध तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी सांगितल्यानुसार पीडित तरूणी रेवाडी जिल्ह्याची रहिवासी आहे. पाच दिवसांपूर्वी ती संजय आणि नरेशसोबत फिरण्यासाठी माउंट आबूला गेलीहोती. तेथून ते उदयपूर आणि नंतर जयपूरला गेले. या प्रवासादरम्यान आरोपींनी तरूणीवर माउंट आबू, उदयपूर आणि जयपूरच्या श्यामनगर परिसरात बळजबरीने बलात्कार केला. यानंतर सोमवारी ते रेवाडीला जाण्यासाठी निघाले. यावेळी रस्त्यातत हरमाडा परिसरात तरूणीला सोडून ते निघून गेले. यानंतर तरूणीने पोलिसांत तक्रार दाखल केली.


सुचना मिळाल्यानंतर हरमाडा पोलिस घटनास्थील पोहचले आणि तरूणीची चौकशी करून तिला श्यामनगर पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले. यानंतर तरूणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

X
COMMENT