Home | National | Other State | girl was tampered with cab driver Sitting in a car without clothing

सकाळी 9 वाजता कोचिंगसाठी जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या वाटेत आला कार ड्रायव्हर, म्हणाला - गाडीत बस, तिने नकार दिल्यानंतर केला पाठलाग... मुलगी म्हणाली - ड्रायव्हरने कपडे घातलेले नव्हते

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2019, 02:08 PM IST

मुलीने वडिलांना सांगितले घडलेला प्रकार, पोलिसात तक्रार दाखल

  • girl was  tampered with cab driver Sitting in a car without clothing

    चंडीगड - येथे भरदिवसा मुलीची छेड काढल्याची वेगळेच प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने अर्धनग्न अवस्थेत मुलीची वाट अडवली, तिचा पाठलाग केला, तिच्यासोबत अभद्र व्यवहार केला आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या घटनेनंतर मुलगी चांगलीत भयभीत झाली. ती आपली कोचिंग सोडून थेट पंजाबला तिच्या घरी गेली. ती परत चंडीगडला येण्यास नकार देत होती. यानंतर हे प्रकरण समोर आले. तिने आपल्या वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर वडिलांनी चंडीगड पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल करून त्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत.

    विनोद कुमार असे आरोपीचे नाव आहे. विनोद एक कॅब ड्रायव्हर आहे. पोलिस विनोदचा जुना रेकॉर्ड तपासत आहे. याशिवाय आरोपीने यापूर्वी दुसऱ्या मुलीची अशी छेड तर काढली नाही ना याबाबत पोलिस त्याची चौकशी करत आहेत. पीडिता मोहाली येथे पदव्युत्तरचे शिक्षण घेत आहे.


    मुलगी म्हणाली - तो कारमध्ये नग्नावस्थेत बसला होता, कारमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर केली मारहाण


    मिळालेल्या माहितनुसार सदरील घटना 4 एप्रिल सकाळी 9 वाजेच्या सुमारस घडली. मुलगी दररोज प्रमाणे ऑटोने गुरुद्वारा चौक येथे गेली आणि तेथून पायी सेक्टर 34 कडे जात होती. दरम्यान कॅब ड्रायव्हर तेथे आला आणि त्याने मुलीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. आरोपीने मुलीची वाट अडवली आणि तिला कारमध्ये बसण्यास सांगितले. मुलगी घडत असलेला प्रकारमुळे भयभीत झाली. आणि ती आरोपीच्या तावडीतून बाहेर पडली. या दरम्यान मुलीने कारचा नंबर लिहिला होता. पीडिताच्या मते, आरोपी कॅब ड्रायव्हर घटनेवेळी कारमध्ये अर्धनग्न अवस्थेत होता.


Trending