आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेला निघालेली विद्यार्थिनी कंटेनरखाली चिरडून जागीच ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री- आयशर कंटेनर व लुना दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत लुनावर परीक्षा देण्यासाठी जाणारी विद्यार्थिनी कंटेनरखाली चिरडल्याने जागेवरच ठार झाली आहे. हा अपघात बुधवार, दि.१२ रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास घडला आहे. शीतल श्रीपत भालेराव (१७, रा.कृष्णपूरवाडी, ता.औरंगाबाद) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. 


औरंगाबाद तालुक्यातील कृष्णपूरवाडी येथील शीतल भालेराव ही मयूर पार्क येथील दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीची विद्यार्थिनी होती. दररोज कृष्णपूरवाडी ते मयूर पार्क (हर्सूल) येथे लुना टीव्हीएस (एमएच२० सीझेड १८३३) येणे-जाणे करत होती. ती बुधवारी सकाळी शाळेत प्रथम सत्र परीक्षेसाठी कृष्णपूरवाडीहून मयूर पार्क हर्सूलकडे जात असताना सावंगी बायपासवरील महाराणा चौकात समोरून येणारे आयशर कंटेनर (एमएच ४८ एजी ४९८५) चाकाखाली आल्याने शीतल चिरडून लुनाचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघाताची नोंद फुलंब्री पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पो.हे.कॉ. जनार्दन मुरमे करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...