आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षीय दुष्कर्म पीडिताने इच्छामृत्युची परवानगी मिळल्यानंतर संपवले जीवन, लैंगिक शोषणानंतर अनेक वर्षांपासून नैराश्यात होती पीडिता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हेग(नेदरलँड) - येथे एका दुष्कर्म पीडिता नोआ पॉटहोवेनने इच्छामृत्यूची परवानगी मिळाल्यानंतर आपले जीवन संपवले. नोआचे लहानपणापासूनच लैंगिक शोषण झाले होते. वयाच्या अकराव्या आणि चौदाव्या वर्षी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. यामुळे ती अनेक दिवसांपासून धक्क्यातून सावरली नव्हती. घडलेल्या प्रकारामुळे ती सतत नैराश्यात होती. यामुळे तिने इच्छामृत्यूची मागणी केली होती. 

 

गुरुवारी नेदरलँड सरकारने सांगितले की, 17 वर्षीय दुष्कर्म पीडिता नोआ पॉटहोवेनचा मृत्यू इच्छामृत्युने झाला नसल्याचा दावा केला आहे. हेग येथील एण्ड ऑफ लाइफ या हॉस्पीटलने सांगितले की, 'नोवाच्या मृत्यूबाबत जे काही रिपोर्टिंग करण्यात आली ती चुकीची आहे. नोवाने अन्न-पाण्याचा त्याग केला होता आणि तिच्या मृत्यूचे हेच खरे कारण झाल्याचे तिच्या मित्रांनी सांगितले.'

 

मीडिया रिपोर्ट्सने बुधवारी सांगितले होते की, 17 वर्षीय नोआ पॉटहोवेनने रविवारी इच्छामृत्यु कायद्यांतर्गत आपल्या घरी सरकारी रूग्णालयाच्या मदतीने मृत्यूला कवटाळले होते. नोआचे लहानपणापासूनच अनेकवेळा लैंगिक शोषण झाले होते. अगोदर 11 व्या वर्षी आणि नंतर 14 व्या वर्षी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. यामुळे ती बऱ्याच दिवसांपासून या धक्क्यातून सावरली नव्हती. तसेच ती नैराश्य आणि अनोरेक्सिया (भूक न लागणे) या अडचणींसोबत झगडत होती. 

 

मृत्युबाबत सोशल मीडियावर सांगितले होते
नोआने गेल्या आठवड्यात एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या 10 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्सला सांगितले होते की, ती येत्या 10 दिवसांमध्ये आपले जीवन संपवणार आहे. तिने पोस्ट मध्ये लिहिले होते की, 'ती अनेक वर्षांपासून अडचणींशी झगडून थकली आहे आणि आता अन्न-पाण्याचा त्याग केला आहे.' नोआने गेल्या वर्षी इच्छामृत्यु देणाऱ्या रूग्णालयाशी संपर्क साधला होता. त्यांचे उत्तर आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना याबाबत समजले. पण काही मीडिया रिपोर्ट्समद्ये सांगण्यात आलेकी, नोआचा मृत्यू सामान्यरित्या झाला आहे. 

 

चॉकलेट खाण्याची इच्छा राहिली
नोआ ने 'विनिंग ऑर लर्निंग' नावाने आत्मकथा देखील लिहिल ीआहे. यासाठी तिला पुरस्कार सु्द्धा मिळाला होता. या पुस्तकात तिने दुष्कर्मच्या तनावासोबतच्या संघर्षाविषयी लिहिले आहे. अशा परिस्थितीतून झगडणाऱ्या लोकांना मदत मिळावी या उद्देशानेच हे पुस्तक लिहिल आहे. नोआने एक विशलिस्ट सुद्धा तयार केली होती. यामध्ये तिने स्कूटर चालवणे, दारू पीणे, सिगारेट ओढणे. टॅटू काढणे, घोडेस्वारी करणे यांसारख्या इच्छा लिहिल्या होत्या. तिचे आणखी इच्छा होती जी पूर्ण झाली नाही. तिला व्हाइट चॉकलेट बार आवडत होता. पण लठ्ठ होण्याच्या भीतीने गेल्या अनेक वर्षांपासून तिने चॉकलेटला स्पर्श सुद्धा केला नव्हता. 

 

नेदरलँडमध्ये कायदेशीररित्या मान्य आहे इच्छामृत्यु 

इंस्टाग्राम पोस्टनंतर नोआने रविवारी इच्छामृत्यु घेतला. नेदरलँडमध्ये इच्छामृत्युसाठी 'टर्मिनेशन ऑफ लाइफ ऑन रिक्वेस्ट अॅण्ड असिस्टेड सुसाइड अॅक्ट ऑफ 2001' कायदा आहे. याअंतर्गत डॉक्टरांनी निश्चित केले की, रुग्णाच्या वेदना त्याच्या सहनशक्तीच्या बाहेर आहेत तर त्याची इच्छामृत्युची याचिकेला मंजुरी मिळते. नेदरलँडमध्ये 12 वर्षापर्यंतच्या लहान मुलांची इच्छामृत्युची याचिका सुद्धा मंजूर करण्यात येऊ शकते. नेदरलँडमध्ये 2017 साली अंदाजे 6585 लोकांनी इच्छामृत्युने आपले जीवन संपवले होते. 

बातम्या आणखी आहेत...