आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्वॉयफ्रेंडने फक्त 1400 रुपयांसाठी तिला वेश्यालयात विकले होते, 22 तासांतच 110 जणांनी केला रेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटन - ब्रिटनच्या एका 25 वर्षीय तरुणीने आपल्यासोबत झालेल्या पाशवी अत्याचाराची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे.  मेगन (बदललेले नाव) जेव्हा 14 वर्षांची होते तेव्हा एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोघांनी सोबत जगण्यामरण्याची शपथ घेतली होती. परंतु मेगनने विचार केला नव्हता की, ज्याच्यासोबत ती पूर्ण आयुष्य घालवण्याचा विचार करत आहे, तोच प्रियकर तिची फक्त 1400 रुपयांसाठी वेश्यालयात विक्री करेल. 

 

सेक्स स्लेव्ह बनवले...
- मेगनने सांगितले की, तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालेला होता. यानंतर ती आपल्या आईसोबत राहू लागली होती. 14 वर्षे वयात ती आपल्या आईसोबत ग्रीसमध्ये सुट्या घालवायला गेली होती.

- मेगनने सांगितले की, येथेच तिचे आयुष्य नरक बनले होते. तिने सांगितले की, ''घटस्फोटानंतर माझ्या आईला दारूचे व्यसन लागले होते. ती मलाही बारमध्ये घेऊन जायची. एका दिवशी माझी नजर 22 वर्षांच्या जेकवर गेली. तो मला एकटक पाहत होता. मलाही त्याला पाहून चांगले वाटत होते. हे सर्व माझ्या आईने पाहिले, पण ती काहीच म्हटली नाही.''

- आम्ही तिथे नियमितपणे जात होतो. एका दिवशी तो माझ्या आईसमोरच माझ्याशी बोलू लागला. माझ्या आईने आम्हाला रोखले नाही, कारण ती स्वत:च बारमालकासोबत बोलण्यात बिझी राहायची. आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवू लागलो. एका दिवशी त्याने मला एका अनोळखी जागेवर नेऊन सोडले, ते एक ब्रॉथल होते. तेथे मला सांगण्यात आले की, माझी 1400 रुपयांत विक्री झालेली आहे.''

 

दररोज 50 पुरुष करायचे रेप

मेगनने सांगितले, ''तेथे दररोज 50 पुरुष माझ्यावर बलात्कार करत होते. तेथे मला मजबूर केले जात होते. मी नकार दिल्यावर मला दोरीने बांधून अत्याचार केले जात होते. एका दिवशी तर माझ्यासोबत क्रौर्याचीही हद्द झाली. एका दिवसात 22 तासांच्या आत माझ्यावर 110 जणांनी रेप केला.''

 

आईच्या आजारपणामुळे नरकातून निघू शकले नाही
- मेगनला जेव्हा देहव्यापाराच्या दलदलीत ढकलण्यात आले तेव्हा तिच्या आईला कॅन्सर झालेला होता. कुंटणखाना चालवणाऱ्यांनी तिच्या या कमजोरीचा फायदा उचलला आणि तिच्या आईला पैसे पोहोचवण्याचे आमिष दाखवून तिच्या शरीराची विक्री करत राहिले. जवळजवळ 5 वर्षे ती या नरकयातना सहन करत होती. यानंतर 2009 मध्ये ती कुंटणखान्यातून पळून गेली.

 

आजही लपून राहत आहे मेगन
- देहव्यापाराच्या दलदलीतून पळून आलेल्या मेगनने आपली कहाणी एका ब्लॉगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे. ती म्हणाली की, ती आता आपले नाव बदलून राहत आहे आणि आपला पत्ता कुणालाच देत नाही. कारण तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या जीविताला देहव्यापार करणाऱ्यांपासून धोका आहे.

 

आता बनणार आहे आई
- मेगनने ब्लॉगमध्ये सांगितले की, त्या नरकातून पळून आल्यानंतर ती आता शांततेत आयुष्य जगत आहे. तिचा एक पार्टनरही आहे आणि ती आता एका बाळाची आई बनणार आहे. मेगनने सांगितले की, 6 वर्षे वेश्यालयात राहिल्याने मी स्वत:ला कमजोर समजत होते. मला स्वत:चा खूप रागही येतो. तिचे म्हणणे आहे की, या घटनेमुळे तिला मानसि धक्का बसलेला आहे. मेगन म्हणते, माझ्या मनात सारखे आत्महत्येचे विचार येतात. माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही, असेही वाटते. या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी ती आता डॉक्टरांचा सल्ला घेत आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...