आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापानिपत (हरियाणा)- बालविवाहाच्या विरुद्ध न्यायालयीन लढा जिंकून आपल्या मर्जीने लग्न करणाऱ्या एका मुलीची सध्या पानिपतमध्ये चर्चा होत आहे. 18 वर्षांच्या शशीचे ती 8 वर्षांची असताना लग्न झाले होते. दीड वर्षापूर्वी तिच्या सासरचे तिला घेउन जाण्यासाठी आले तेव्हा तिने जाण्यास नकार दिला. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले, न्यायालयीन लढ्यानंतर आपल्या पसंतीच्या मुलासोबत तिने लग्न केले. यादरम्यान शशीच्या घरच्यांनी तिची साथ सोडली नाही. शशीच्या काकाचे लग्न ठरत नव्हते यामुळे 2008 मध्ये कुटुंबीयांनी शशीचे लग्न यामुळे केले होते. मधला मार्ग म्हणत शशीचे लग्न तिच्या होणाऱ्या काकूच्या भावासोबत लावण्यात आले. त्या वेळी शशीचे वय फक्त 8 वर्षे होते.
शशीने सांगितले की, तिला आणि तिच्या कुटुंबाला खूप त्रास देण्यात आला
- "मी खूप लहान होते, तेव्हा माझे लग्न माझ्या मनाविरुद्ध लावण्यात आले. मला तर लग्न काय असते याचा अर्थही माहीत नव्हता, पण मी मोठी झाले त्या वेळी मला कळले की, माझा बालविवाह झालेला आहे."
- "मी मागच्या वर्षी 11वीत होते, तेव्हा माझ्या शाळेत बालविवाहावर सेमिनार झाला होता, त्यात सांगितले की, बालविवाह ही एक वाईट प्रथा आणि गुन्हा आहे. हा मोडलाही जाऊ शकतो, तेव्हाच मी निश्चय केला की, हे लग्न मी स्वीकारणार नाही. काही दिवसांनंतर सासरचे लोक मला घ्यायला आले, पण मी माझ्या वडिलांना स्पष्ट सांगितले की, मी जाणार नाही."
लोकांनी अनेक वेळा घाबरवले, धमकावले
- “मार्च 2017 मध्ये वडिलांसोबत जाऊन मी महिला सुरक्षा आणि बालविवाह कार्यालयात तक्रार दाखल केली. सासरच्या लोकांना बोलावले, पण त्यांनी ऐकले नाही. न्यायालयात मे 2017 ला लग्न मोडण्यासाठी केस दाखल केली, त्यानंतर 16 जुलै 2018 ला न्यायालयाने हा बालविवाह आहे, असे सांगून लग्न रद्द केले."
- "न्यायालयीन लढ लढताना अनेक वेळा आमच्यावर दबाव टाकण्यात आला. माझ्या काकूला तिच्या घरच्यांनी घरी नेले आणि मी त्यांच्या घरी जात नाही तोपर्यंत तिला परत पाठवणार नाही, असे सांगितले.”
- “माझ्या घरी मला सासरी पाठवण्यासाठी पंचायत बोलवण्यात आली. पण मी पंचायतचे नाही ऐकले. त्यामुळे त्यांनी आम्हाला वाळीत टाकले. आमची जमीन हडपली. या संघर्षात माझे सर्व काही नष्ट झाले, पण माझ्या वडिलांनी माझी साथ सोडली नाही.”
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.