आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक खेळ खेळूया म्हणत एक्स गर्लफ्रेंडने प्रियकराच्या डोळ्यावर बांधली ओढणी आणि कापला गळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक आठवड्यापूर्वी नोएडातील एक्सप्रेसवे पोलीस ठाणे हद्दीमध्ये ऑटोचालक युवकाचा चाकूने गळा कापून झालेला खून त्याच्याच एक्स गर्लफ्रेंडने केल्याचे उघड झाले आहे. खुनाच्या या कटामध्ये मृत युवकाचा लहानपणीच मित्र आणि प्रेयसीचा सहभाग होता. प्रियकराचा खून करण्यासाठी तरुणीने सर्वात पहिले दिल्लीमधून चाकू खरेदी केला आणि एक्स बॉयफ्रेंडसोबत ऑटोमधून एक्स्प्रेस हायवेवरील जंगलात गेली. तरुणीने प्रियकराला एक खेळ खेळुयात असे सांगून त्याच्या डोळ्यावर ओढणी बांधली आणि त्यानंतर चाकूने त्याचा गळा कापला. खुनातील आरोपी तरुणीचे नाव सायरा असून मित्राचे नाव रहीम आहे. 3 सप्टेंबरला जंगलात इसराफीलचे शव आढळून आले होते.


4 वर्षांपूर्वी दिल्लीवरून बिहारला जाताना ट्रेनमध्ये झाली होती या तिघांची मैत्री
जवळपास 4 वर्षानंतर इसराफील मित्र राहींसोबत दिल्लीवरून बिहारला चालला होता. रेल्वेमध्ये त्याच्या सीटजवळच सायरा बसलेली होती. प्रवासामध्ये या तिघांची मैत्री झाली. एकमेकांचे फोन नंबरही यांनी घेतले. स्टेशनवर उतरल्यानंतर इसराफीलने सायराला घरापर्यंत सोडले होते. त्यानंतर हळूहळू या दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दिल्लीला परत आल्यानंतर इसराफील ऑटो चालवू लागला आणि दोघांच्या भेटीही वाढल्या.


मृत तरुणाचा मित्रही करत होता तरुणीवर प्रेम
सायराने पोलिसांना सांगितले की, दोन वर्षांपूर्वी इसराफीलने तिला न सांगता दुसरे लग्न केले होते. त्याला एक मुलगाही आहे. ही गोष्ट तिने रहिमला सांगितली. त्यालेली रहिमनेही मी तुझ्यावर रेल्वेतील भेटेपासूनच प्रेम करत असल्याचे तिला सांगितले. यामुळे सायरा इसराफीलवर नाराज असल्याचे रहिमला समजताच त्याने इसराफीलचा काटा काढण्याचे ठरवले. मागील काही काळापासून सायरा आणि रहीम यांचे प्रेम प्रकरण सुरु होते. राहील या घटनेच्या दोन दिवस आधीच गावाकडून दिल्लीला आला होता. त्यानंतर या दोघांनी एक चाकू खरेदी केला आणि खुनाचा कट रचला.


सिटी सेंटर मेट्रोपासून एक्स्प्रेसवेकडे इसराफीलला घेऊन गेली सायरा 
3 सप्टेंबरला सायरा आणि रहीम दिल्लीतून मेट्रोमध्ये सोबत निघाले परंतु रहीम गोल्फ कोर्स मेट्रो स्टेशनवर उतरला. सायरा नोएडा सिटी सेंटरवर उतरली. येथे आधीपासूनच इसराफील ऑटो घेऊन सायराची वाट पाहत होता. त्यानंतर हे दोघेही सेक्टर-168 मधील नाल्याजवळील झुडपात गेले. ऑटोचा पाठलाग करत काही वेळाने रहीम तेथे पोहोचला आणि झुडपात लपून बसला. ठरलेल्या प्लॅनिंगनुसार तरुणीने इसराफीलला चाकू मारला. रहीमही तेथेच होता त्यानेही इसराफीलला चाकूने वार केले. त्यानंतर दगडाने त्याचा चेहरा विद्रुप केला आणि त्याचे पाकीट घेऊन दोघेही फरार झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच रहीम विमानाने बिहारला गेला. पोलिसांनी कॉल डिटेल आणि मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही आरोपींना रविवारी अटक केली.

बातम्या आणखी आहेत...