आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरा बनून मंडपात बसला होता तरूण, सुरू होती हळदीची प्रथा, अचानक एक मुलगी आली आणि झाला गोंधळ...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


होशंगाबाद(मध्यप्रदेश)- सिवनीमालवाच्या एका युवकाला परिसरातील मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर आत्याचार करणे आणि नंतर दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणे महागात पडले. पोलिसांनी लग्नाच्या विधीमधून तरूणाला घेऊन गेले. अंगावर हळद लावलेली असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.


आता तरूणाच्या लहान भावासोबत होणार लग्न
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार सत्यनारायण कहारचा मुलगा राहुल कहार(23) चे लग्न 22 एप्रिलला होणार होते. राहुल आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात बोलावले आणि चौकसी केली. राहुलने मुलीला लग्नास नकार दिल्याने त्याच्याविरूद्ध आत्याचार करण्यावरून एससीएसटी अॅक्ट कलमाअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राहुलचे लग्न मोडले. पण आता त्याचा लहान भाऊ तरुण कहार राहुलसोबत ज्या मुलीचे लग्न ठरले होते त्या मुलीसोबत लग्न करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...