आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Girlfriend Was Beaten By Family, Sad Boyfriend Committed Suicide After That Girl Also Did Same

कुटुंबीयांनी प्रेयसीला केली मारहाण; दुःखी होऊन प्रियकराने घेतले विष, त्याच्या मृत्यूची माहिती कळताच मुलीनेही केली आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांगल सोती(उत्तर प्रदेश)- येथील एका व्यक्तीने आपल्या प्रेयसिला मारहाण झाल्याची बातमी ऐकताच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, नांगल सोती पोलिस स्टेशन हद्दीतील तिसोतरा गावात देवेंद्र(22)ने मंगळवारी रात्री विषारी पदार्थ खाल्ला. दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच त्याची प्रेयसी सोनिया(21)नेही विष प्राषण करून आत्महत्या केली.

 

 

पोलिस अधिक्षक वली मौहम्मद यांनी सांगितल्यानुसार प्राथमिक तपासात हे समोर आले आहे की, सोनियाने देवेंद्रला कुटुंबीयांकडून मारहाण झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे नाराज होऊन देवेंद्रने विष प्यायले. त्यानंतर सोनियाला त्याच्या मृत्यूची माहिती कळताच तिनेही आत्महत्या केली. त्या दोघांच्या प्रेमामुळे कुटुंबीय नाराज होते.