आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसस्सी करणाऱ्या विद्यार्थीनीला दोन मुलांच्या वडिलांसोबत करायचे होते लग्न, पण लग्न न झाल्यामुळे उचलले हे पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चितौड़गड (राजस्थान) : लग्न होत नसल्यामुळे एका प्रेमीयुगूलाने रविवारी विष प्राशन केले. उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला तर युवकाची प्रकृती गंभीर असून त्यावर उपचार सुरू आहेत. बीएसस्सी करत असलेल्या विवाहित युवतीला गावातीलच दोन मुलांचा पिता असलेल्या एका युवकाशी लग्न करायचे होते. अशातच दोघांनी आत्महत्या करण्याच्या हेतूने विष प्राशन केले.  

 

रविवारी संध्याकाळी चावंडिया गाव परिसरात 19 वर्षीय टीना आणि 23 वर्षीय रतनलाल यांनी विषारी औषध प्राशन केले. प्रकृती बिघडल्यामुळे दोघांनाही सीएचसी येथे दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना चितौड़गड येथील रूग्णालयात नेण्यात आले. येथे रात्री उशीरा टीनाचा मृत्यू झाला. सोमवारी चावंडिया गावात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर रतनलाल जीवन आणि मृत्यूमध्ये संघर्ष करत आहे. 


टीनावर होते प्रेम पण आपला संसार मोडण्यास तयार नव्हता रतन

बेंगू कॉलेजमध्ये बीएसस्सी करत असलेल्या टीनाचे पालका गाव हे सासर आहे. पण ती माहेरीच राहत होती. तिचे गावातीलच रतनलालसोबत प्रेमसंबंध होते. रतनलाल विवाहित असून त्याला 4 वर्षीय मुलागा आहे. पाच दिवसांपूर्वीच त्याला दुसरा झाला होता. टीनाचे रतनवर प्रेम असल्यामुळे तिला रतनसोबत लग्न करायचे होते. पण रतनला स्वतःचा संसार मोडायचा नव्हता. यामुळे दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे दोघांनीही सोबतच विष प्राशन केले. 

 

तडफडत मित्राला मोबाइलवर सांगितले  -  आम्हाला वाचवा
रविवारी संध्याकाळी 6 वाजेच्यासुमारास दोघेही जीवन संपवण्याच्या उद्देशाने शेतात भेटले. दोघांनाही सोबतच विष पीले. यामुळे युवती जागेवरच बेशुद्ध झाली. रतन थोडा शुद्धीवर होता. त्याने मोबाइलवर फोन करून आपल्या एका मित्राला बोलावले. मित्र काही लोकांना सोबत घेऊन शेतात आला. पण अंधार पडल्यामुळे आणि रतनने योग्य ती जागा न सांगितल्यामुळे रतन आणि टीनाला शोधण्यास उशीर झाला. लोकांना दोघेही सापडले तेव्हा ते तडफडत होते. नंतर दोघांना रूग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  

बातम्या आणखी आहेत...