आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैतुलमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार; दोघांना भुसावळात पडल्या बेड्या, पो‍लिस चौकशीत बिंग फुटले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- जंक्शनबाहेर संशयित हालचाली करणाऱ्या दोन जणांना जीआरपीने सोमवारी रात्री ११ वाजता ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत दोघे मध्यप्रदेशातील बैतूल तालुक्यात घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी असल्याचे समोर आले. जीआरपीने दोघांना बैतूल पोलिसांच्या ताब्यात दिले. 

 

साेमवारी रात्री जंक्शनबाहेर गाैरीशंकर बिहारीलाल उदारे (वय २७, रा. टेमरू) आणि विरेंद्र बिहारी नागले (वय ३० रा. शाेभापूर, बैतूल) हे संशयित हालचाली करताना आढळले. त्यांच्याबद्दल पाेलिस कर्मचारी जयकुमार काेळी यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे सहायक फाैजदार भरत शिरसाठ, मधुकर न्हावकर, जगदीश ठाकूर, नितीन पाटील, अजीत तडवी, शैलेंद्र पाटील, महेंद्र पाटील व स्नेहा अडिकणे यांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांना जीआरपी निरीक्षक दिलीप गढरी यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनी अत्याचार प्रकरणाची कबुली दिली. घटनेनंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी घरून पळून आल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले. मंगळवारी चाेपण्णा पाेलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी भुसावळ जीअारपी पाेलिस ठाण्यात दुपारी आले होते. दोन्ही संशयितांना जीआरपीने त्यांच्याकडे सोपवले. मध्य प्रदेशात गुन्हा दाखल हाेत असताना योगायोगाने दोन्ही संशयित जीआरपीच्या ताब्यात सापडले. 

 

यामुळे आला संशय 
दाेन्ही संशयीतांची दाढी वाढलेली होती. त्यामुळे ते घरातून पळून आले असावेत, असा पोलिसांना संशय आला. सुरूवातीला दोघे काहीही बाेलत नव्हते. मात्र, पोलिसांनी दम भरल्यावर त्यांनी अत्याचाराची माहिती दिली. त्यामुळे जीआरपी पाेलिसांनी तात्काळ मध्यप्रदेशातील चाेपण्णा पाेलिस ठाण्यात फाेन लावून माहिती घेतली. त्यावेळी पोलिस ठाण्यात अत्याचारीत मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते. 

 

बातम्या आणखी आहेत...