आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Girls Abused, Chilli Powder In Private Parts At Delhi Shelter Home, FIR Registered

शिस्तीच्या नावे अल्पवयीन मुलींच्या प्रायव्हेट पार्टमध्ये भरली जाते मिरची पूड; दिल्लीतील शेल्टर होम विरोधात FIR

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येथील द्वारका परिसरात असलेल्या एका शेल्टर होममध्ये अल्पवयीन मुलींवर अमानवीय अत्याचाराची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शेल्टर होममध्ये महिला कर्मचारी अल्पवयीन आणि लहान-लहान मुलींना शिस्तीच्या नावे अमानवीय यातना देतात. त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकून त्यांना शिक्षा दिली जाते. दिल्ली महिला आयोगाने वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर एक विशेष समिती नेमली होती. त्याच समितीने आपला अहवाल तयार करून पोलिसांत शेल्टर होमच्या विरोधात पोक्सो अॅक्ट आणि जेजे अॅक्ट अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.


6-15 वर्षे वयोगटातील मुलींनी केला खुलासा
- दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारनेच दिल्ली महिला आयोगाला विशेष समिती नेमून खासगी आणि सरकारी शेल्टर होमच्या चौकशीचे निर्देश दिले होते. या समितीने शेल्टर होममध्ये राहणाऱ्या 6 ते 15 वर्षे वयोगटातील 22 मुलींशी बातचीत करून त्यांचे अनुभव जाणून घेतले. यामध्येच मुलींवर होणाऱ्या अत्याचारा खुलासा झाला आहे.
- शेल्टर होममध्ये स्टाफ अपुरे असल्याने त्या मुलींकडूनच घरगुती काम, सफाईकाम, धुणी-भांडी, टॉयलेट क्लिनिंग अशा प्रकारची कामे सुद्धा करून घेतली जातात. अशात मुलींना आपली खोली साफ केली नसेल तर त्यांना मारहाण केली जाते. त्यांना सुट्या लागल्यानंतर घरी सुद्धा पाठवले जात नाही.
- विशेष समितीने हा अहवाल दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांना सुपूर्द केला. तसेच मालिवाल यांनी पोलिस उपायुक्तांना फोन करून यासंदर्भातील माहिती दिली. यानंतर दोघांनी संबंधित शेल्टर होमला जाऊन पीडित मुलींचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...