आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवणा ऱ्या मुलींमध्ये त्याच वयाच्या मुलांच्या तुलनेत नैराश्यात लोटले जाण्याची शक्यता दुपटीने बळावत असल्याचा इशारा एका अभ्यासात देण्यात आला आहे. क्लिनिकल मेडिसीन जनरलमध्ये प्रकाशित या अभ्यासात सोशल मीडियाचा वापर व नैराश्याच्या लक्षणांवर प्रथमच प्रकाश टाकला आहे.
ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन(यूएलसी)मधील संशोधकांनी जवळपास ११ हजार लोकांच्या डेटाचा अभ्यास केला. त्यात १४ वर्षांच्या मुलींचे सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचे प्रमाण प्रचंड असल्याचे दिसून आले. दोन पंचमांश मुली तीन तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात, तर त्या तुलनेत एक पंचमांश वेळ देत आहेत. यामध्ये सोशल मीडियाचा वापर करत नसलेल्या मुलींचे प्रमाण केवळ चार टक्के आहे. त्याउलट मुलांमध्ये हे प्रमाण १० टक्के आहे. अभ्यासामध्ये १२ टक्के लाइट सोशल मीडिया युजर्स व ३८ टक्के हेवी सोशल मीडिया युजर्समध्ये गंभीर स्थितीतील नैराश्याची लक्षणे आढळली.
४० टक्के मुलींच्या झोपेत अडथळे
सोशल मीडियाचा वापर व नैराश्याचा संबंध अधोरेखित करणारी प्रक्रिया शास्त्रज्ञांनी अभ्यासली. त्यात ४० टक्के मुली व २५ टक्के मुलांना ऑनलाइन छळ किंवा सायबरबुलिंगचा सामना करावा लागल्याचे दिसले. पाहणीत सहभागी २८ टक्के मुलांच्या तुलनेत ४० टक्के मुलींच्या झोपेत अनेकदा अडथळा आला. या श्रेणीतील मुलींमध्ये स्वाभिमानाचा अभाव आढळून आला. झोप कमी होणे व ऑनलाइन छळाच्या प्रकारात नैराश्याच्या मुळाशी सोशल मीडियाचा अतिरेकी वापर कारणीभूत असल्याचे दिसून आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.