आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेड काढणाऱ्या तरुणास मुलींनी चपलेने बदडले; रस्त्याने फटके देत काढली धिंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू- सेलू येथील बसस्थानकावर शुक्रवारी (दि.२८) दुपारी एकच्या सुमारास विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तीन तरुणांपैकी तावडीत सापडलेल्या एका तरुणास विद्यार्थिनींनी चपलेने झोडपले. 


सेलू बसस्थानकावर असे प्रकार नेहमी चालूच असतात. पण तक्रारच होत नसल्याने छेडछाड करणारांवर कारवाई होत नाही. शुक्रवारी बसस्थानकात विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तीन तरुणांपैकी दोन जण पळून गेले. मात्र, विद्यार्थिनींच्या तावडीत सापडलेल्या एका तरुणास चपलेचा प्रसाद मिळाला. हा गोंधळ सुमारे तासभर चालू होता. त्यानंतर पोलिसांची गाडी आली. पण विद्यार्थिनींनी या तरुणास पोलिसाच्या स्वाधीन करण्यास नकार देत बसस्थानक ते पोलिस ठाण्यापर्यंत रस्त्याने फटके देत त्याची धिंड काढली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या तरुणास वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात नेले होते. 

बातम्या आणखी आहेत...