आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girls Forced To Dance And Physically Assaulted By Guests As CBI Charge Sheet In Muzaffarpur Shelter Home

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

34 मुलींच्या आयुष्याला नर्क बनवणारे 12 आरोपी, रिपोर्टने सगळ्यांना केले शॉक्ड, जाणून घ्या कोणी काय काय केले...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरपुर(बिहार)- शेल्टर होम कांडच्या 21 आरोपींवर दाखल असलेली CBI च्या चार्जशीटमधून अनेक हैराण करणारे खुलासे झाले आहेत. येथून जप्त केलेले ग्रे रंगाचे बेड शीट आणि कपड्यांचा जेव्हा मुजफ्फरपुरच्या FSL यूनिटने तपास केला, तेव्हा त्यात सिमेन आणि रक्ताचे डाग आढळले. त्यामुळे शेल्टर होमच्या घृणास्पद कृत्याचे पुरावे समोर आले. चार्जशीटमध्ये सांगण्यात आले की, यांत पूर्ण येक नेक्सेस काम करायचा, ज्याचा मास्टरमाइड दुसरा-तिसरा कोणी नसून शेल्टर होमचा संचालक ब्रजेश ठाकुर होता. जाणून घ्या कोण होते ते 12 आरोपी ज्यांनी मुलींचे आयुष्य नर्कापेक्षा बत्तर बनवले.


1. ब्रजेश ठाकुर
शेल्टर होमचा संचालक. ब्रजेशवर 29 मुलीनं लैंगिक हिंसा, आत्याचार आणि मारहाणीसोबतच इतर आरोप लावले आहेत. काहींनी सांगितले की, ब्रजेशने शेल्टर होमच्या 3 मुलींची हत्या केली आहे.


2. शाइस्ता परवीन उर्फ मधु
ब्रजेशची एकदम जवळील, सेवा संकल्प आणि विकास समितीच्या कार्यांना मॅनेज करायची. त्यासोबतच मुलींनी सेक्सचे शिक्षण द्यायची आणि त्यांनी धमकवायची. नकार देणाऱ्या मुलींना जेवायला देत नव्हती.


3. दिलीप वर्मा
बाल कल्याण समितीचा अध्यक्ष होते. अनेकवेळा मुलींच्या काउंस्लींगच्या नावावर मुलींवर आत्याचार करायचा. ब्रजेशसोबत त्याच्या कामात सामील होता.


4. रोजी रानी
बाल संरक्षण यूनीटची सहाय्यक होती. नेहमी शेल्टर होममध्ये जायची. मुली तिच्याकडे शेल्टर होममध्ये होणाऱ्या आत्याचाराविषयी सांगायच्या तेव्हा ती त्यांचा आवाज दाबायची.


5. रवि रौशन
जिल्हा बाल संरक्षण पदाधिकारी होती, त्याच्यावर मुलींच्या सुरक्षेची जबाबजदारी होती. त्याने देखील ब्रजेश, दिलीप वर्मा, गुड्डू इत्यादी आरोपींप्रमाने मुलींवर आत्याचार केला.


6. रामाशंकर सिंह उर्फ मास्टर साहब
'प्रात: कमल' वर्तमानपत्र आणि ब्रजेशच्या हॉटेलचा मॅनेजर आहे. ब्रजेशसोबत हादेखील मुलींच्या हिंसेत सहभागी होती. त्यांना मारायचा आणि त्यांच्यावर लैंगिक आत्याचार करायचा.


7. डॉ. अश्विनी कुमार
मुलींना नशेची आणि बेशुद्धीचे औषध द्यायचा. 


8.विक्की
ब्रजेशची खास मधुचा भाच्चा. हादेखील रात्री शेल्टर होमला यायचा आणि मुलींवर आत्याचार करायचा.


9. इंदू कुमारी
शेल्टर होमची अधिक्षीका होती. मुलींचा आरोप आहे की, ती मुलींना होमोसेक्ससाठी उत्तेजीक करायची, त्यासोबत बलात्काराची तक्रार करणाऱ्या मुलींना मारायची.


10. मीनू देवी
शेल्टर होमची गृह माता होती, मुलींना घरासारखे वातावरण तयार करण्याची जबाबदारी होती. पण तिच मुलींना रात्री नशा येण्याचे औषघ द्यायची.


11. नेहा कुमारी
शेल्टर होमची नर्स. मुलींना काठीने मारहाम करायची आणि आरोपींच्या कामात त्यांना मदत करायची.


12. किरण कुमारी
शेल्टर होममध्ये हेल्पर होती. मुलींला मारहाण करायची आणि त्यांना बळजबरीने शारिरीक संबंध बनवायला लावायची.


असा झाला खुलासा
मुंबईच्या टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायंसच्या 'कोशिश' टीमच्या सोशल ऑडिट रिपोर्टमध्ये हे प्रकरण समोर आले होते. 28 मे, 2018 ला FIR दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शेल्टर होममधून 46 मुलींना मुक्त करण्यात आले.