• Home
  • Girl’s glowing white pupil prompted her mother to take her to hospital – where doctors removed her eye after finding 10 tumours

फोटोमध्ये मुलीच्या डोळ्यात आढळला विचीत्र डाग, आईला संशय आला म्हणून हॉस्पीटलला गेले, नंतर समोर आले सत्य...


मुलीची आई म्हणते- त्यादिवसी तो फोटो काढला नसता तर वाईड घडले असते.

दिव्य मराठी वेब टीम

Apr 17,2019 04:25:00 PM IST

ओरेगन- अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेच्या अलर्टनेसमुळे तिच्या मुलीचा जीव वाचला आहे. काही वर्षांपूर्वी महिला आपल्या मुलीचे फोटो पाहत होती, त्यावेळी तिला मुलीच्या डोळ्ताय एक डाग विचीत्र डाग दिसला. त्यानंतर महिला मुलीला घेऊन हॉस्पीटलला गेली. महिलेला आलेला संशय खरा होता, कारण तो डाग सामान्य नसून कँसरचे लक्षण होते. त्यानंतर मुलीच्या डोळ्याला काढावे लागले, पण मुलीचा जीव वाचला. आता तीन वर्षानंतर मुलगी पूर्णपणे बरी आहे आमि प्रोस्थेटिक डोळ्याने पाहत आहे.


आईचा संशय खरा होता
- ही स्टोरी अमेरिकेच्या ओरेगनमध्ये राहणारी महिला एली स्मिथ आणि तिची पाच वर्षीय मुलगी ग्रेसी कोरिगेनची आहे. एलीला मे 2016 मध्ये मुलीच्या डोळ्यात कँसर असल्याचे कळाले. ग्रेसीला रेटिनोब्लास्टोमा नावाचा कँसर झाला होता, जो 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळतो.
- मे 2016 मध्ये ती फक्त दोन वर्षांची होती, तेव्हा एली तिचे काही फोटोज पाहत होती, त्यावळी एलीला मुलीच्या डोळ्यात पांढऱ्या रंगाचा डाग दिसला. जो कॅमेराचा फ्लॅश चमकल्यामुळे दिसला होता.
- त्यानंतर ती मुलीला हॉस्पीटलमध्ये घेऊन गेली, त्यानंतर डॉक्टरांनी मुलीला रेटिनोब्लास्टोमा नावाच्या कँसर असल्याचे सांगितले.
- डॉक्टरांनी सांगितले की, हा आजार 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना होतो.


डोळ्यात निघाले 10 ट्यूमर

- आजाराबद्दल कळाल्यावर एली मुलीला घेऊन 4 हजार किलोमीटर दूर फिलाडेल्फियाच्या विल्सच्या हॉस्पिटलला गेली. तिथे गेल्यावर मुलीच्या डोळ्यात 10 ट्यूमर असल्याचे कळाले. त्यानंतर डॉक्टरांनी मुलीचा डोळा कढावा लागेल असे सांगितले.


- दुसऱ्या दिवसी ऑपरेशन करून मुलीचा डोळा काढण्यात आला. ऑपरेशनच्या दोन महिनने थोडा त्रास झाला. आता तीन वर्षानंतर ती एकदम ठीक असून आपल्या मित्रांना आपल्या मॅजिकल आयबद्दल सांगते.

पुढील स्लाइडवर पाहा मुलीचे फोटोज...

X
COMMENT