आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Girls In Same Sex Relationship Moves To Punjab High Court Against Families To Live Together

2 तरुणींच्या नात्यात भिंत बनला समाज, कुटुंब; भेटण्यासह बोलण्यावरही लावला Ban, कोर्टात जाऊन म्हणाल्या, आम्हाला कुणीच वेगळे करू शकत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - हरियाणातील एका गावात दोन तरुणींच्या मैत्रीवर कुटुंबियांसह अख्खा गावाने बंदी घातली आहे. कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी त्यांच्या भेटीसह बोलण्यावर सुद्धा निर्बंध लादले आहेत. त्या दोघींना आता फोनवर सुद्धा बोलू दिले जात नाही. तरीही सर्वांचा विरोध झुगारून या मैत्रिणी एकमेकींसोबत राहू इच्छित आहेत. कुठल्याही परिस्थितीत त्या एकमेकींना सोडण्यास तयार नाहीत. त्यांनी या सर्व बंधनांना झुगारून हायकोर्टात गावकरी आणि कुटुंबियांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. 


मिळाले पोलिस संरक्षण
पंजाब-हरियाणा हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर या दोघींनी घरी जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना संरक्षण देत पंचकुला येथील सेफ हाऊसमध्ये ठेवले आहे. पोलिसांनी त्या दोघींच्या कुटुंबियांना नोटीस पाठवून यासंदर्भातील माहिती सुद्धा दिली. ज्या गावात ही घटना घडली, तेथे सर्वत्र या दोघींच्या चर्चा आहेत. 


लग्न करणार नाही, फक्त सोबत राहू द्या...
या दोन्ही मुलींनी दैनिक भास्करशी संवाद साधला. तसेच समाजाच्या बंधनात राहणार नसल्याचे स्पष्ट केले. "आम्ही दोघी एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स आहोत. प्रत्येक गोष्ट मैत्रिणींप्रमाणे एकमेकींना शेअर करतो. आमच्यात पवित्र नाते आहे. आम्ही एकमेकींसोबत विवाह करू इच्छित नाहीत. आम्हा दोघींना आयुष्यभर एकमेकींसोबत राहायचे आहे. आम्हाला कुणीच वेगळे करू शकत नाही. आमचे कुटुंबीय मुलांसोबत लग्नासाठी दबाव टाकत आहेत. परंतु, कुठल्याही मुलासोबत लग्न करूच शकत नाहीत. तरीही आम्हाला एकत्रित राहणे तर दूर बोलू देखील दिले जात नाही. त्यामुळेच, आम्ही हायकोर्टात धाव घेतली आहे." कुटुंबियांकडे जाण्यास नकार देणाऱ्या या तरुणींना कुठेही राहून आणि काहीही काम करून एकमेकींसोबत राहू असा ठाम निश्चय घेतला आहे. त्यापैकी एक सुशिक्षित आहे. तर दुसरीने ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...