Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | girls nature according samudra shastra

समुद्रशास्त्र : मुलींच्या चालण्यावरून समजू शकतात त्यांच्याविषयीच्या या खास गोष्टी

रिलिजन डेस्क | Update - Nov 09, 2018, 12:01 AM IST

वराह संहितेमध्ये मुलींच्या चालीवरून त्यांच्या स्वभाव आणि सवयींविषयी समजू शकते

 • girls nature according samudra shastra

  समुद्रशास्त्र आणि ज्योतिषनुसार एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीवरून त्याच्या स्वभावाविषयी विविध गोष्टी समजू शकतात. ज्योतिषाचार्य पं प्रफुल्ल भट्‌ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वराह संहितेमध्ये मुलींच्या चालीवरून त्यांच्या स्वभाव आणि सवयींविषयी समजू शकते. येथे जाणून घ्या, चालण्याच्या पद्धतीवरून एखाद्याचा स्वभाव कसा असू शकतो.


  फास्ट चालणाऱ्या मुली -
  ज्योतिष शास्त्रानुसार अशा मुलींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव जास्त राहतो. अनेक मुलींना जलद गतीने चालण्याची सवय असते. अशा मुलींना कोणत्याही ठिकाणी पोहोचण्याची खूप घाई असते परंतु असेही सांगितले जाते की फास्ट चालणाऱ्या मुलींवर मंगळाचा प्रभाव असल्यामुळे एनर्जी जास्त राहते. अशा मुलींमध्ये आत्मविश्वास भरपूर असतो तसेच धाडसी असतात. अशा मुली जीवनातील अडचणींचा सहजपणे सामना करतात.


  लहान-लहान पावले टाकून चालणाऱ्या मुली -
  अशाप्रकारच्या मुलींवर बुध ग्रहाचा प्रभाव जास्त राहतो. यामुळे अशा मुली अगदी आरामात छोटे-छोटे पावले टाकून चालतात. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे अशा मुली शांत राहतात. स्वतःचे आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगणे याना आवडते. अशाप्रकारच्या मुली हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभावाच्या तसेच बुद्धिमान असतात.


  पुढे जाणून घ्या, इतर पद्धतीने चालणाऱ्या मुलींविषयी....

 • girls nature according samudra shastra

  हळू-हळू चालणाऱ्या मुली -
  काही मुलींना हळू-हळू चालण्याची सवय असते. ज्योतिष शास्त्रानुसार अशा मुलींवर शनीचा प्रभाव जास्त राहतो. या मुली सहज आणि शांत स्वभावाच्या असतात. नेहमी सावध राहतात आणि प्रत्येक काम विचारपूर्वक करतात.

 • girls nature according samudra shastra

  पाय घासत चालणाऱ्या मुली -
  ज्योतिष शास्त्रानुसार अशाप्रकारच्या मुलींवर राहू आणि शनीचा प्रभाव जास्त राहतो. या दोन्ही ग्रहांमुळे ज्या मुली पाय घासत चालतात त्यांना आयुष्यात विविध दुःख सहन करावे लागतात. अशा मुली खूप कन्फ्युज राहतात. अशा मुली प्रत्येक गोष्टीवर सखील विचार करतात परंतु तरीही घेतलेला निर्णय चुकीचा ठरतो.

Trending