आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जरंडीत 21 विद्यार्थिनींचा मुख्याध्यापकाकडून लैंगिक छळ, आरोपीच्या राजकीय संबंधांमुळे दबाव 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जरंडी (ता. साेयगाव) - जिल्हा परिषद शाळेत सहावी ते अाठवीच्या वर्गात शिकणाऱ्या २१ विद्यार्थिनींचा ९ महिन्यांपासून छळ करणारा लंपट मुख्याध्यापक हरदास काटाेले याच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. अाराेपी राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न हाेत असल्याचा संशय अाहे. 


३०० पालकांनी मंगळवारी गटविकास अधिकाऱ्याला जाब विचारला हाेता, मात्र अद्याप मुलींनी तक्रार दिली नसल्याचे पाेलिसांचे म्हणणे हाेते. या संतापजनक प्रकारानंतर 'दिव्य मराठी'ने गुरुवारी शाळेला भेट देऊन पीडित मुलींना विश्वासात घेत संवाद साधला असता खरा प्रकार उजेडात अाला. पालकांच्या दबावामुळे अाधी शालेय शिक्षण समिती व तंटामुक्ती समितीमार्फत मुख्याध्यापकाविराेधात पाेलिसांत तक्रार देण्याचा देखावा करण्यात अाला. मात्र नंतर दुसऱ्याच दिवशी बदनामीची व काेर्ट-कचेरीची अप्रत्यक्ष धमकी देत मुली व पालकांना तक्रार मागे घेण्यास पाेलिसांनी भाग पाडल्याचे समाेर अाले. तंटामुक्ती, शालेय व्यवस्थापन समितीनेही पालकांच्या सांगण्यावरून तक्रार मागे घेतल्याचे सांगितले. 

 

मुलींना विश्वासात घेऊन बाेलते केल्यानंतर उजेडात अाले वास्तव 
अाराेपीचे भाजप-सेनेशी संबंध, खासदाराकडे अाश्रय 

विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणारा मुख्याध्यापक हरदास काटाेले याचे थेट राजकीय पक्षाशी संबंध असल्याने प्रकरण दडपले जात अाहे. पालकांनी जाब विचारल्यानंतर ताे शेजारी जिल्ह्यातील खासदाराकडे अाश्रयाला गेला हाेता, अशी चर्चा अाहे. साेयगावातील शिवसेनेचे नगराध्यक्ष काटाेलचे नातेवाईक अाहेत, तर त्याच्या पत्नीने भाजपकडून पंचायत समितीची निवडणूकही लढवली हाेती. याच राजकीय दबावामुळे अाराेपीला अभय मिळत अाहे. 

 

दिव्य मराठी'ने धीर दिल्यानंतर मुली म्हणतात.. अाम्ही अाता नाही घाबरणार 
'दिव्य मराठी'ने पीडित मुलींना धीर दिला. त्यावर अाता कुणी कितीही दबाव अाणला तरी अाम्ही अाता घाबरणार नाही, मुख्याध्यापकाच्या अन्यायाला वाचा फाेडल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. गुरुवारी पाेलिसांसह अनेकांनी या मुलींची चाैकशी केली तेव्हा त्या धीटाईने बाेलताना दिसल्या. मात्र या लढाईत त्यांना अाता पालक व गावकऱ्यांकडून पाठिंबा मिळण्याची अपेक्षा अाहे. 

 

आई म्हणते, अाता बस झाली शाळा 
पीडित मुलींचे बहुतांश पालक शेतकरी, शेतमजूर असल्याने गुरुवारी त्यांच्याशी थेट संवाद हाेऊ शकला नाही. परंतु गेल्या तीन-चार दिवसांत शाळेतील मुलींची उपस्थिती कमी झाल्याचे गावकरी सांगतात. याबाबत चाैकशी केली असता एका मुलीने सांगितले, 'आई म्हणते, अाता बस झाली शाळा. यापुढे शाळेत जायचे नाही. कुणी विचारलं तर फार बोलायचं नाही..' 

 

राजकीय दबावामुळे गुन्हा नाेंदवण्यास टाळाटाळ, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न 
पाेलिसांची भूमिका संशयास्पद 

मुख्याध्यापकाकडून लैंगिक छळास बळी पडलेल्या मुलींना धीर देऊन अाराेपीविराेधात कडक कारवाई करणे पाेलिसांकडून अपेक्षित असताना या प्रकरणात मात्र पाेलिस अधिकारीच बदनामी, काेर्ट-कचेरीचा ससेमिरा मागे लागण्याची भीती दाखवत पीडित मुली व पालकांना अप्रत्यक्ष धमकावत असल्याचे समाेर अाले. त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त हाेत अाहे. 

 

राजकारणाची यापेक्षा खालची पातळी असू शकत नाही ! 
'दिव्य मराठी'ने केेलेल्या पाहणीत जे काही आढळले ते धक्कादायक आहे. अशा प्रकरणातही राजकारणी जर आपली 'शक्ती' वापरत असतील तर यापेक्षा खालची पातळी असू शकत नाही. पोलिसांनी या अल्पवयीन मुलींचे रक्षण करायचे की राजकीय आश्रय घेणाऱ्या संशयित गुन्हेगारांचे? राजकारणी आणि पोलिस यांची अशी अभद्र युती नवी नसली तरी 'दिव्य मराठी' ती आता चालू देणार नाही. या मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. भाजप, सेनेच्या नेत्यांनीही आपली भूमिका जाहीर करण्याची, नव्हे कृती करण्याची गरज आहे हे सांगणे न लगे. 

 

ज्या पाेलिसांकडून कारवाईची अपेक्षा त्यांनीच घातली पीडित मुलींना भीती 
मुख्याध्यापकाकडून लैंगिक छळास बळी पडलेल्या मुलींना धीर देऊन अाराेपीविराेधात कारवाई करणे पाेलिसांकडून अपेक्षित असताना या प्रकरणात मात्र पाेलिस अधिकाऱ्यांनीच बदनामी, चाैकशीचा ससेमिरा मागे लागण्याची भीती दाखवत पीडित मुली व पालकांनाअप्रत्यक्ष धमकावून तक्रार मागे घेण्यास भाग पाडल्याचे पीडित कुटुंबीयांशी बाेलल्यानंतर समाेर अाले. या संदर्भात 'दिव्य मराठी'ने पाेलिस निरीक्षक शेख शकील यांच्याशी साधलेला संवाद.. 
पाेलिस : तक्रार प्राप्त हाेताच बुधवारी आम्ही दोन महिला कॉन्स्टेबलसह, एक पोलिस उपनिरीक्षकाला जरंडीच्या शाळेत पाठवले. तेथील विद्यार्थनींनी अापबीती अाम्हाला सांगितली. मात्र संबंधित मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई झाल्याचे कळल्यानंतर पालकांनी अाम्हाला तक्रार मागे घ्यायची अाहे असे सांगितले. 
दिव्य मराठी : पालक मागे हटले तरी कुकृत्य करणाऱ्या अाराेपला शिक्षा हाेण्यासाठी तुम्ही स्वत:हूनही तक्रार दाखल करू शकता ना? 
पाेलिस : (घूमजाव) 'मुलींना तर अाम्हाला 'तसे' काहीच सांगितले नाही. मुख्याध्यापक केवळ वर्गात जाऊन बसा, शांत बसा असे रागवायचा' एवढेच मुलींनी सांगितले. 
दिव्य मराठी : शैक्षणिक संस्थेत चाैकशीस जाताना पाेलिसांनी गणवेशात जाऊ नये असा नियम अाहे. मात्र बुधवारी पाेलिसांचे पथक गणवेशात शाळेत गेले? 
पाेलिस : अाम्ही सिव्हील ड्रेसमध्ये गेलाे हाेताे.. (प्रत्यक्षात गणवेशात अाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे). 
गुरुवारी मात्र पाेलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये शाळेला भेट देऊन चूक सुधारली. 

 

अाम्ही तक्रार दाखल करू : बीडीअाे 
मंगळवारी पालकांनी गटविकास अधिकारी एम.सी. राठाेड यांना घेराव घालून कुकृत्य करणाऱ्या मुख्याध्यापकावर कडक कारवाईची मागणी केली हाेती. अाता या प्रकरणी संताप व्यक्त हाेत असल्याने त्यांनी स्वत: शाळेला भेट देऊन चाैकशी केली. 'आमच्याकडे पीडित मुलींच्या तक्रारीचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले जबाब अाले आहेत. याच पुराव्यांनुसार मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात अाली. अाता पुढील कारवाई होण्यासाठीही हे जबाब वापरून आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल करू', असे राठाेड यांनी सांगितले. तर 'मुख्याध्यापक मनाेविकृत अाहे का याची वैद्यकीय चाचणी केली जाईल त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल,' असे प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.पी. जयस्वाल यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...