आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हळदीलाच घेतली तिने ‘फुलराणी आता जळणार नाही’ची शपथ

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लक्ष्मीकांत बगाडे

बुलडाणा - हिंगणघाटची फुलराणी जग सोडून गेल्यानंतर मुली, महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मात्र, बुलडाण्यात अंगाला हळद लागताच एका नववधूने ‘फुलराणी आता जळणार नाही’ची शपथ घेतली.येथील सुनीता तुकाराम झुंजार या अनाथ मुलीला १४ फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाइन डे’ ला तिलाही जीवनसाथी मिळणार आहे. या जोडीदारासोबत अंगावर अक्षता पडण्याआधी गुरुवार,दि. १३ फेब्रुवारी रोजी हळद लागताच तिने ‘फुलराणी आता जळणार नाही’ची शपथ घेतली. तिच्यासोबत असलेल्या ‘लेक माझी’ च्या महिलांनाही ही संकल्पना आवडल्याने त्यांनीही शपथ घेतली. जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी विद्या माळी यांनी ही शपथ दिली.
दरम्यान, संजय गायकवाड यांनी मानसकन्या सुनीतासाठी वरसंशोधन केले अन् भिन्न समाजाचा वर दाताळा येथे शोधला. संजय कोलते व अविनाश चौधरी तसेच छायाचित्रकार प्रशांत सोनोने यांच्या माध्यमातून हा विवाह सोहळा १४ फेब्रुवारीला होणार आहे. या आंतरजातीय विवाहात कन्यादान प्राचार्य सुधाकरराव काळवाघे व नलिनीताई काळवाघे करणार होते. मात्र, ते वैद्यकीय कारणाने बाहेरगावी गेल्यामुळे कन्यादान काेण करणार हा प्रश्न निर्माण झाला अन् लेक माझी अभियानच्या वतीने त्याचा पुढाकार आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. गजानन पडघान यांनी घेतला. नवरीचा मामा म्हणून ते आता लग्नविधी वेळी नवरीच्या मागे उभे राहणार आहेत.शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जयसिंगराजे देशमुख यांनीही तिला मदत केली. पत्रकार राजेंद्र काळे, दै. दिव्य मराठीच्या वतीने जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मीकांत बगाडे यांनीही तिला शुभेच्छा दिल्या.या वेळी हळदीच्या वेळीच ‘दिव्य मराठी’ची संकल्पना वाचून नववधू सुनीता तुकाराम झुंजार हिलीही फुलराणी आता जळणाार नसल्याची  शपथ घेण्याची तीव्र इच्छा झाली अन् अंगाला हळद लागताच तिने ही शपथ घेतली. एवढेच नाही, तर उद्याही लग्नमंडपात वऱ्हाडींच्या साक्षीने ही शपथ घेण्याचा मनोदय तिने व्यक्त केला.बालपणीच हरपले माता-पित्याचे छत्र

आठ वर्षांची असतानाच सुनीताचे मातृ व पितृछत्र हरपले. काही दिवस लाेणार येथे रामदास माेरे या शिक्षिकांकडे श्री शिवाजी विद्यालय येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण बुलडाणा येथे आशीर्वाद मेडिकलचे संचालक संजय गायकवाड व त्यांच्या सहचारिणी पुष्पा गायकवाड यांनी दिलेल्या मायेच्या आधाराने केले. त्यामुळे तिचे शिक्षण बी.एड. व आयटीआयपर्यंत झाले.
 

0