आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर - अयाेध्येतील २५ एकर जागा हिंदूंना, १५ एकर मुस्लिमांना आणि उर्वरित जागा बौद्धांना द्या. कारण तेथे तिघांनीही दावा केला आहे, असा नवा फॉर्म्युला आरपीआयचे (ए) अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. अयोध्येतील राम मंदिराच्या जागेवर मंदिर, मशिदीपूर्वी बौद्ध मंदिर होते. उत्खननात बौद्ध अवशेष सापडले आहेत. शंकराचार्यांच्या काळात हिंदू मतांचा प्रचार-प्रसार झाल्यानंतर हिंदूंनी बौद्ध मंदिर पाडून तेथे राम मंदिर बांधले. मुस्लिम आक्रमकांनी मंदिर पाडून मशीद बांधली.
त्यामुळे हा प्रश्न सामोपचारानेच सोडवावा, असे आठवले म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या अयोध्येत जाण्याने वा संतांच्या दबावामुळे अयोध्येत मंदिर होणार नाही, तर ते न्यायालयाच्या निकालामुळेच होईल. त्यामुळे अध्यादेश न काढता न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करण्यात यावी, असे आपले स्पष्ट मत असल्याचे आठवले म्हणाले. अयोध्येत राम मंदिराच्या जागी मशीद होती ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राम मंदिर बांधताना मुस्लिमांना टाळता येणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन सामोपचाराने हा प्रश्न सोडवण्यात यावा, असे आठवले म्हणाले.
रिपाइंचा १० फेब्रुवारीला आैरंगाबादेत मेळावा
२० जानेवारी २०१९ रोजी नागपुरात रिपाइंचा मेळावा होणार असून त्यात वेगळ्या विदर्भाचा ठराव करण्यात येईल. १० फेब्रुवारी २०१९ रोजी औरंगाबादमध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे. एमआयएम व वंचित आघाडीने घेतलेले फक्त मराठवाड्यातील जनतेच्या उपस्थितीने मैदान भरवून दाखवू, असा दावा आठवलेंनी केला. देशात २० कोटी एकर पडीक जमीन आहे. ती सर्व भूमिहीनांना वाटप करावी. उत्तर प्रदेशात शहराला गोडसेचे नाव देण्याची मागणी होत आहे. इतर कोणाचेही नाव दिले तरी चालेल, पण गोडसेचे नाव देण्यापूर्वी विचार करावा, असे आठवले म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.