Home | International | Other Country | Give advice to others about doing the work in which you fail

अपयश येत असलेले कार्य करण्याचा इतरांना द्या सल्ला; स्वत: यशस्वी होण्याची शक्यता ६५ टक्यांपेक्षा जास्त

वृत्तसंस्था | Update - Aug 30, 2018, 05:55 AM IST

एखाद्या कामात जर तुम्ही सातत्याने अपयशी ठरत असाल तर तेच काम इतर लोकांना करण्याचा सल्ला देणे सुरू करा.

 • Give advice to others about doing the work in which you fail

  शिकागो- एखाद्या कामात जर तुम्ही सातत्याने अपयशी ठरत असाल तर तेच काम इतर लोकांना करण्याचा सल्ला देणे सुरू करा. यामुळे यश मिळण्याची शक्यता ६५% हून अधिक आहे. अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन आणि शिकागो विद्यापीठाने संयुक्तरीत्या २ हजार लोकांवर केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.


  सततच्या अपयशामुळे एखादी व्यक्ती निराश झाल्यास तिला प्रेरित करण्यासाठी काय करता येईल? याचे उत्तर शोधण्यासाठी संशोधनकर्त्यांनी केलेल्या अभ्यासात अनेक रंजक गोष्टी समोर आल्या. अपयशाचा सामना करत असलेली व्यक्ती जेव्हा एखाद्याला सल्ला देते तेव्हा त्या व्यक्तीचा स्वत: आत्मविश्वास वाढत असतो. दुसऱ्यांना जो सल्ला दिला जातो तो सल्ला अपयश मिळत असलेल्या व्यक्तीच्या सचेतन (सबकॉन्शियस) मेंदूपर्यंतही पोहोचतो. याचा परिणाम सल्ला देणाऱ्या व्यक्तीच्या व्यवहारावर दिसून येतो आणि यशस्वी होण्याची शक्यता ६५% पेक्षा जास्त वाढते.


  ज्यांच्यावर संशोधन केले गेले अशा ६८% बेरोजगारांनी म्हटले की, इतरांना नोकरी शोधण्याचा मार्ग दाखवल्यास अपयश येत असलेल्या व्यक्तीला नोकरी शोधणे सोपे जाते. ज्या ७२% लोकांकडे सतत पैसा येतो, पण बचत होत नाही अशांनी व्यावसायिक बँकरप्रमाणे पैशाचे व्यवस्थापन करण्याच्या टिप्स दिल्यास त्यांनाही बचतीचा योग्य मार्ग सापडतो. ७७% लोक रागावर नियंत्रण करत नाहीत. त्यांनी इतरांना रागावर नियंत्रण करण्याचा सल्ला दिल्यास त्यांचा राग शांत होतो. ७२% लोक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी याच पद्धतीने प्रेरित करत असतात.


  इतरांना मदतीची तयारी दाखवून स्वत:ची मदत करता येईल
  संशोधक टीममधील डॉ. फिशबॅच म्हणाले की, अपयश आल्यानंतर लोक इतरांकडून यशस्वी होण्याचा सल्ला घेतात. पण अयशस्वी लोकांनी सल्ला मागण्याऐवजी सल्ला द्यावा, असा आग्रह आम्ही धरला. अयशस्वी व्यक्तीचे म्हणणे कदाचितच ऐकले जाईल, पण काही जणांनी त्यांचे म्हणणे ऐकले तर अयशस्वी व्यक्तीलाच याचा फायदा जास्त होतो. सल्ला देऊन अयशस्वी व्यक्ती मुळात दुसऱ्यांची मदत करत असते. पण वास्तवात याचा फायदा त्या व्यक्तीलाच होतो. म्हणूनच याला सेल्फ हेल्प थेरपी असे नाव देण्यात आले आहे.

Trending