पेट्रोलपंपावरील कामगारांना कायद्याप्रमाणे / पेट्रोलपंपावरील कामगारांना कायद्याप्रमाणे सवलती द्या; आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे सवलती मिळाव्यात, अशी मागणी बहुजन हिताय श्रमिक कामगार युनियनने सहायक कामगार आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Aug 28,2018 11:33:00 AM IST

अकोला- पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे सवलती मिळाव्यात, अशी मागणी बहुजन हिताय श्रमिक कामगार युनियनने सहायक कामगार आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


बहुजन हिताय श्रमिक कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष भीमराव वाकोडे यांनी सहायक कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, पेट्रोलपंपावर कामगार दोन, तीन पाळ्यात काम करतात. असे असतानाही कामगारांना स्थायिक करण्यात आले नाही. त्यांना कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन देण्यात येत नाही. त्यांना वेतनाची पगारपत्रक मिळत नाही. काही पेट्रोलपंपाचे माक त्यांचा भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करत नाही, कमी वेतन देऊन व्हाऊचरवर जादा दाखवून सह्या घेतल्या जातात४ दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात वाढ होते. परंतु महागाई भत्ता त्यांना मिळत नाही यासाठी कामगारांनी हक्क लढाई लढल्यास त्यांना कामावरून कमी करण्याचा दम भरल्या जातो, अशा प्रकारे पेट्रोलपंपाचे संचालक कामगारांचे शोषण करीत आहेत. या बाबीची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी भीमराव वाकोडे यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन उभारावे लागेल असाही इशारा त्यांनी दिला आहे.

X