आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा! खासदार छत्रपती संभाजीराजे यांची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दहावीत ९४ टक्के गुण मिळवूनही चांगल्या काॅलेजमध्ये प्रवेश व दुष्काळी परिस्थितीमुळे कॉलेजचे शुल्क भरू शकत नसल्यामुळे उस्मानाबादच्या देवळाली गावातील अक्षय शहाजी देवकर या विद्यार्थ्याने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेने व्यथित होत कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ‘आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा’ अशी मागणी केली आहे. आरक्षणामुळे मराठा समाजाची होत असलेली घुसमट पुन्हा एकदा समोर आल्याचे सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे.