Home | Maharashtra | Vidarva | Akola | Gives livestock to six; Both arrested and arrested

सहा गोवंशांना जीवदान; दोघांना अटक,पाच लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी | Update - Nov 07, 2018, 10:47 AM IST

दोन आरोपींना अटक केली असून शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला

  • Gives livestock to six; Both arrested and arrested

    मूर्तिजापूर - बडनेरा येथून बार्शीटाकळी येथे अवैधरीत्या गोवंश गाडीत डांबून नेण्यात येत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरु असताना बडनेरा कडून अकोल्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी केेली असता गाडीत ६ बैल दिसले. ही कारवाई मंगळवारी ६ नोव्हेंबरला केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

    याबाबत पोलिस सूत्रांनुसार शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिस हेड कॉन्स्टेबल रजनीकांत बिसणे, पोलिस कॉन्स्टेबल शाम मोहाळे, मनोहर मोहोड, संतोष गवई, चालक कश्यप व मनीष मालठाने यांनी राष्ट्रीय महामार्गावरील व्यास हॉटेल जवळ सापळा रचून वाहनांची तपासणी केली असता त्यांना बोलेरो पिकअप क्रं. एम.एच.३०-- एबी--२४८८ मध्ये गोवंश आढळले. या गोवंश बाबत कागदपत्र आढळले नाही. पोलिसांनी पीकअप बोलेरो सह सहा बैलांसह पाच लाख ४४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

    बैलांना येथील गोरक्षणात पाठवले. तर आरोपी मो.समिर मो. सलीम कुरेशी,शे.वशीम शे.मतीन कुरेशी राहणार देवरणरोड जुनी वस्ती मुर्तिजापुर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदारांंच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जोशी हे करीत आहेत.

Trending